23 एप्रिल सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - संगमनेरमधील रस्त्यासाठी 24 कोटी मंजूर...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. सोनई येथील जेष्ठ पत्रकार सोपानराव दरंदले यांचे निधन
जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व सोनई येथील जेष्ठ पत्रकार सोपानराव दरंदले(नाना) यांचे निधन. असून सर्वत्र शोककळा आहे .
२. शिक्षकाने घेतले पाच कुटुंब दत्तक
लॉकडाऊन झाल्याने उपासमार होत असल्याने शिक्षक विजय कारखेले यांनी त्रिभुवन वाडी येथील पाच कुटुंब दत्तक घेऊन समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केलाय.
३. किरकोळ कारणावरून एकास मारहाण
भाडोत्री केलेल्या गाडीच्या भाड्याचे पैसे मागितल्याच्या रागातून पाच जणांनी मिळून गाडीच्या चालकास शिवीगाळ करून लाकडी दांड्याने डोक्यात मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे घडली.
4. चार लाख रुपयांचा गांजा पकडला
श्रीरामपूर शहरात गांजाची विक्री करणाऱ्या व्यक्तीला मुद्देमालासह पोलिसांनी बुधवारी अटक केली. चार लाख 60 हजार रुपयांचा गांजा या कारवाईत जप्त करण्यात आलाय . पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके आणि पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी ही कारवाई केली
5. चार लाख रुपयांची फसवणूक
कुरणवाडी येथे दोन शेतकऱ्यांच्या शेतातील टरबूज एका व्यापाऱ्याने खरेदी केली. त्यापोटी व्यापाऱ्याने त्या शेतकऱ्याला चार लाख सात हजार 500 रुपयांचा धनादेश दिला. शेतकऱ्यांनी धनादेश बँकेत भरले असता. ते वटले नाहीत.
6. मटनाच्या वाटयावरून दोन गटात जोरदार हाणामाऱ्या
मटनाच्या वाटयावरून दोन गटात जोरदार हाणामाऱ्या झाल्या यावेळी काठ्या कुर्हाडी दगडाचा वापर करण्यात आला . या घटनेत आठ जण जखमी झाले असून नगर तालुका पोलीसात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले बाळेवाडी गावांमध्ये ही घटना घडली .
7. मालवाहतूक टेम्पोतून प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा
मालवाहतूक टेम्पोतून प्रवाशांची वाहतूक करणारा टेम्पो चालकाविरुद्ध शहर पोलिसांनी कारवाई केली. श्रीरामपूर शहरातून एक अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणारा टेम्पो अशोक नगरच्या दिशेने गेला असल्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या लक्षात आले .त्यांनी तात्काळ सदर टेम्पो चालकाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांच्यासह पोलीस नाईक संजय दुधाडे दत्तात्रय दिघे.
8. कोरोना संकटात विखेंनी राजकारण करू नये
कोरोना हे जागतिक संकट आहे त्याचा सामना करताना राधाकृष्ण विखे यांनी राजकारण करू नये असा सल्ला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देत त्यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले . ज्या ऑक्सीजन टँकरला संदर्भ देत विखे यांनी आरोप केले.
9. संगमनेरमधील रस्त्यासाठी 24 कोटी मंजूर
राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर शहरातून जाणारा जुना नाशिक पुणे रस्त्याच्या संगमनेर खुर्द बस स्थानक ते अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत 9 किलोमीटरचा रस्त्यासाठी 24 कोटी 56 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
१०. २२ हजार कोरोना बाधित घेत आहेत उपचार
नगर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात व कोविद सेंटर मध्ये तब्ब्ल २२ हजार ६८ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. किओरॉनचा प्रॅदुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने लोकडाऊन सुरु केला आहे . मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत असून, हि गर्दी कमीच करण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे .
No comments
Post a Comment