Breaking News

1/breakingnews/recent

23 एप्रिल Good Morning सह्याद्री

No comments

 News24सह्याद्री - महाराष्ट्राच्या वाट्याला किती रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स?........पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे

 अपडेट



TOP HEADLINES


1. आता ऑक्सिजन कमी पडणार नाही:- जिल्हाधिकारी
लातुर शहरात कोरोनाच्या रुग्णावर उपचारा दरम्यान ऑक्सिजनची मोठी टंचाई निर्माण झाल्याने आयकॉन हॉस्पिटलचे डॉक्टर व रुग्णालच्या नातेवाईकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला होता जिल्हा प्रशासन ऑक्सिजन उपलब्ध करून देत नसेल तर आम्ही रुग्णावर उपचार करू शकत नाही. 

2. 11 महिन्यापासून शिक्षक विनावेतन, समाजकल्याणच्या आडमुठ्या धोरणाचा परिणाम
राज्य शासनाचे आदेश असताना सुद्धा लातूरच्या समाज कल्याण विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे औसा येथील श्रीनिवास निवासी मतिमंद विद्यालयातील 12 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी गेल्या 11 महिन्यापासून विनावेतन काम करत असून आर्थिक संकटाला तोंड देत आहेत कोरोनाच्या काळात जगावं कसं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

3. प्राणवायू घेऊन 'ऑक्सिजन एक्सप्रेस' महाराष्ट्राकडे रवाना, राज्याला नवसंजीवनी!
 कोरोनाचा प्रादुर्भाव, रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासतोय. अशावेळी महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी समोर आलीय. महाराष्ट्रासाठी प्राणवायू घेऊन ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. तशी माहिती खुद्द रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विटरवरुन दिली आहे. 

4. राज्यात 24 तासांत 67 हजार 13 नवे रुग्ण,
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज रात्रीपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. अशावेळी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली रुग्णवाढ आजही कायम आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 67 हजार 13 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

5. राज्यात १६ दिवसांत २५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका पोलिसांनाही बसताना दिसत आहे. गेल्या १६ दिवसांत २५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर आतापर्यंत एकूण ३८९ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे.

6. महाराष्ट्राच्या वाट्याला किती रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स?
 राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण यामुळे दिवसेंदिवस चिंता वाढत आहे. अशावेळी कोरोना रुग्णांवर उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासत आहे. त्यावरुनही राज्यात जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनची आकडेवारी देण्यात आली आहे.

7. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अदर पुनावालांशी चर्चा,
केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्याची मुभा दिल्यानंतर आता ठाकरे सरकारने सिरम इन्सिट्यूटकडून कोव्हीशिल्ड लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सिरमचे प्रमुख अदर पुनावाला यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, महाराष्ट्राला 20 कोटी लसींची गरज आहे. 

8. लोकसभा माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या निधनाची खोटी बातमी
लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना काल इंदूरच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आज त्यांचा कोविड रिपोर्ट निगेटिव्हही आला आहे. दरम्यान त्यांच्या मृत्यूची खोटी बातमी व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सोशल मीडियावर ट्वीट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे ही अफवा अधिक पसरली आहे. 

9. कोरोना पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या आज तीन महत्त्वाच्या बैठका
 देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या दररोज नवे उच्चांक गाठत आहे.या पार्श्वभूमीवर आज ते  तीन प्रमुख आढावा बैठका घेणार आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. 

10. 'केंद्र सरकारने महाराष्ट्राला लस विकत घ्यायची परवानगी दिली पण महिन्याभराचा साठा अगोदरच बूक केलाय'
केंद्र सरकारने 18 ते 45 या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्यांनी थेट सिरम आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांकडून थेट लस विकत घेण्याची परवानगी दिली होती. मात्र, महाराष्ट्र सरकारने याबाबत सिरम इन्स्टिट्यूटशीबोलणी सुरु केली तेव्हा केंद्र सरकारने लसींचा आगाऊ साठा अगोदरच आरक्षित करुन ठेवल्याची माहिती समोर आली आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *