22 एप्रिल सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - आम्हांला रस्त्यावर उतरावे लागेल;ठाकरे सरकारला मनसेचा इशारा.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. लॉकडाऊन टाळा या मोदींच्या सल्ल्यानंतर शिवसेनेचा हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लाइव्ह येत जनतेशी संवाद साधला. दरम्यान यावेळी त्यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत शिवसेनेकडून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी लॉकडाऊन टाळण्याचा सल्ला दिला होता. मोदींनी लॉकडाऊनपासून वाचण्यावरच भर दिला होता. लॉकडाऊन लागू नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.
2. सीताराम येचुरी यांचे पुत्र आशिष येचुरी यांचा कोरोनामुळे मृत्यू
माकप नेते सीताराम येचुरी यांना पुत्रशोक झाला. आशिष येचुरी यांचे कोरोनावरील उपचारांदरम्यान गुरुवारी सकाळी निधन झाले. आशिष यांच्यावर गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. सीताराम येचुरी यांनी ट्विटरवरुन पुत्रनिधनाची दुःखद बातमी दिली तसेच आशिषवरील उपचारादरम्यान आमच्या मनात आशेचा किरण जागवणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो.
3. "कोरोनाची दुसरी लाट थोपवायला आता डिसेंबर महिना उजाडेल-गुलेरिया
देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. देशात दररोज कोरोनाचे अडीच लाखांहून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. अशात भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केलेल्या वक्तव्यानं सर्वांच्या चिंतेंत भर पडली आहे. देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट परतवून लावायला आता डिसेंबर महिना उजाडेल, असं गुलेरिया यांनी म्हटलंय
4. राज्यात घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवा-नाना पाटोले
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यात लसीकरण प्रभावी ठरत असल्याचे विविध देशांतील लसीकरणावरून दिसत आहे. महाराष्ट्रातही मोठय़ा प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. सध्याच्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्यांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास अडचणी येत आहेत.
5. आम्हांला रस्त्यावर उतरावे लागेल;ठाकरे सरकारला मनसेचा इशारा
कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित मृतदेह उचलण्यासाठी कर्मचारीच नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच अन्य कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन हे काम करावे लागत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले होते.
6. पंकजा मुंडेंच्या अंगरक्षक भावाचं कोरोनानं निधन,ट्विट करत दिली माहिती
कोरोनाचा कहर आता सर्व स्तरात होताना दिसतो आहे माकपचे सरचिटणीस येचुरींनी मुलगा गमावला, त्यानंतर काँग्रेसनं माजी मंत्री वालि यांना गमावलं तर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या अंगरक्षक भावाला गमावलं. गोविंद मुंडे असं त्यांचं नाव. खुद्द पंकजा मुंडे यांनी गोविंद यांच्यासोबतचा फोटो ट्विट करत ही माहिती दिली आहे
7. कुंभमेळ्यावरून येणारे १४ दिवस क्वॉरंटाईन; पोलिस प्रशासन गंभीर
रिद्वारमधून कुंभस्नान करून परत येणाऱ्या भाविकांमुळे कोरोना पसरू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस प्रशासनाने त्यांना १४ दिवस क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली असून रेल्वेने परत आलेल्या भाविकांचे नाव, मोबाईल क्रमांक आणि राहण्याच्या ठिकाणाची माहिती पोलिसांनी पुरविणार असल्याची माहिती समोर आली आहे.
8. नाशिकच्या घटनेनंतर पुणे महापालिकेला खडबडून जाग
नाशिकमधील महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली होती. ऑक्सिजन गळती झाल्यामुळे रूग्णालयातील ऑक्सिजनचा दाब कमी झाला आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रूग्णांचा मृत्यु झाला होता.
9. पुण्याला मोफत लस द्यावी; महापौर, सर्व पक्षनेते अदर पूनावालांना भेटणार
'सीरम इन्स्टिट्यूट' ही संस्था पुणे शहरात आहे. पुण्यामुळे या संस्थेचे नाव जगभरात पोहोचलेले आहे. त्यामुळे या संस्थेने सामाजिक जाणीवेतून पुणेकरांसाठी मोफत लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सर्व पक्षीय नेत्यांनी एकमुखाने केली आहे. याबाबतचे पत्र महापालिकेच्या वतीने लवकरच 'सीरम'ला देण्यात येणार आहे.
10. हैदराबादने अखेर विजयाचे खाते उघडले!
सलग तीन पराभवांनंतर अखेर सनरायजर्स हैदराबादला यंदाच्या आयपीएल मोसमात आपले विजयाचे खाते उघडण्यात यश आले. आज दुपारी झालेल्या सामन्यात हैदराबादने पंजाब किंग्स संघावर ९ विकेट राखून मात केली. या सामन्यात पंजाबचा डाव अवघ्या १२० धावांतच आटोपला आणि हैदराबादने हे लक्ष्य ९ विकेट आणि ८ चेंडू राखून गाठले
No comments
Post a Comment