22 एप्रिल सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - कोविड रुग्णांसाठी व्यापारी वर्गाचा मदतीचा हात...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. कोविड रुग्णांसाठी व्यापारी वर्गाचा मदतीचा हात
कोरोणा रुग्णांवर मोफत सोय करणाऱ्या जामखेडमधील आरोळे कोविड सेंटर मध्ये कोरोणाचे पेशंट वाढल्यामुळे आँक्सीजन ,बेड वाढविणे गरजेचे आहे. या साठी जामखेड मधील प्रशासनाने भुसार व्यापारी वर्गाला विश्वासात घेत देणगीसाठी विनंती केलीय.
2. खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल
शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कलम 144 लागू असताना नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार लोखंडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर लोणी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
३. श्रीगोंद्यात दुचाकी चोराला अटक
तीन जिल्ह्यात दुचाक्या चोरून धुमाकूळ घालणाऱ्या शंकर उर्फ मधुकर पवार या दुचाकी चोराला श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने नगर, पुणे ,सोलापूर जिल्ह्यात 14 गुन्हे केले आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ इथून चोरलेल्या बुलेट सह नगर, पुणे ,सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या पाच दुचाक्या, दोन मोबाईल असा एकूण चार लाख दहा हजारांचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलाय.
४. आ.राधाकृष्ण विखे पाटील यांची सडकून टीका
महाविकास आघाडी सरकारचा आपत्ती व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडला आहे. कुठल्याच यंत्रणेवर सरकारचे नियंत्रण नाही. सरकारचा टास्क फोर्स करतोय काय असा सवाल उपस्थित करताना जिल्ह्यातीलऑक्सिजन संपल्यानंतरही तीन मंत्र्यांचची कर्तबगारी शून्यच दिसलीय. पालकमंत्र्यांना ही जिल्ह्यातील गंभीर परिस्थितीपेक्षा गोकुळ दूध संघाची निवडणूक महत्त्वाची वाटत असल्याची घणाघाती टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
५. राहुरी रेल्वे स्टेशन भुयारी मार्गाच्या प्रश्नांबाबत लोणीत आंदोलन
राहुरी रेल्वे स्टेशन परिसरातील भुयारी रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत खासदार डॉक्टर सुजय विखेंच्या लोणीतील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर १ मे ला सकाळी धरणे आंदोलन करण्याचा इशारा राहुरी येथील तांदुळवाडीच्या माजी उपसरपंच बाळासाहेब पेरणे आणि इतर नागरिकांनी दिलाय.
६. अकोले तालुका काँग्रेस कमिटीचा राष्ट्रवादीला थेट इशारा
आमच्या नेत्याची बैठक उधळून लावून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा निषेध करत आपण जर आघाडीचा धर्म पाळणार नसाल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा अकोले काँग्रेस कमिटीने थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलाय. वेळप्रसंगी दोन हात करण्याची तयारीहि आमची असल्याचे इशारा काँग्रेसचे अध्यक्ष वाकचौरे यांनी दिलाय.
७. साई मंदिरात श्रीराम नवमी उत्सव साध्या पद्धतीने साजरा
शिर्डीमधील साई बाबा संस्थांकडून सर्व नियमांचे पालन करून श्रीराम नवमी उत्साहात साजरी झालीय. १९१५ पासून शिर्डीमध्ये हा उत्सव दरवर्षी धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो, मात्र मागील वर्षांपासून संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढावल्याने यंदा हा शिरं नवमी उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने याठिकाणी साजरा करण्यात आलाय.
८. डोळासणे येथे ४० बेडचे जीवन कोवीड केअर सेंटर सुरु
संगमनेरच्या पठार भागातील कोरोना रुग्णांचे हाल होऊ नयेत ,तसेच कमी खर्चात त्यांच्यावर औषध उपचार व्हावेत यासाठी डोळासने येथील काळभैरवनाथ मंगल कार्यालयात डॉक्टर एम डी घुले, डॉक्टर विपुल भुजबळ, वनिता मांडे, किशोर पोखरकर यां चौघांनी जीवन कोविड केअर सेंटर सुरु केलय.
9. राहुरी कॉलेज परिसरात बिबट्या जेरबंद
राहुरी कॉलेज परिसरामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. पिंजऱ्यात जेरबंद झालेल्या बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती,या घटनेची खबर राहुरी वनविभागाला देण्यात आली, पिंजऱ्यात जेरबंद झालेल्या बिबट्याला डिग्रस नर्सरीमध्ये हलविण्यात आलय.
१०. संगमनेरच्या लोहारेत ऑक्सिजन रिफिलिंग केंद्राला मान्यता
कोरोनाची वाढती रुग्ण संख्या आणि गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा करून लोहारे येथील ऑक्सिजन रिफिलिंग केंद्राला पेसोकडून तातडीची मान्यता मिळवून दिल्याने दररोज नव्याने सातशे ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध होणार आहे.
No comments
Post a Comment