जिल्ह्याची खबरबात - राहता तालुक्यात 229 कोरोना रुग्णांची भर
News24सह्याद्री - राहता तालुक्यात 229 कोरोना रुग्णांची भर....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. हिवरे बाजार येथे उमंग फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचा शुभारंभ
हिवरे बाजार येथे उमंग फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचा शुभारंभ गावच्या सरपंच विमल ठाणगे यांच्या हस्ते झाले उमंग फाउंडेशन ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबवित असून त्यांचे कार्यालयाचे फाउंडेशन च्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या संजीवनी सर्व उपचार केंद्राची देखील उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले तसेच त्यात संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आले.
2. माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर विरोधी संचालक व संचालकसभासदांची निदर्शने
अहमदनगर माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या सेवानिवृत्त नाममात्र सभासदांना सभासदत्व देण्यासाठी पोटनियम दुरुस्ती चा विषय रद्द.
3. कोरोना नियमांचं राहत्यात उलंघन
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राहता शहर 30 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असताना राहता शहरातील सर्व व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत करत शंभर टक्के बंद साठी प्रतिसाद दिला असताना दुय्यम निबंधक कार्यालयात मात्र सर्रास पणे गर्दी जमत खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार दिसून आला.
4. कोपरगाव शहरात पोलीस धाडीत 107 गोमान्स जप्त
कोपरगाव शहरातील आयशा कॉलीनीत सार्वजनिक वाचनालय कॅनपाउंड समोरील पत्र्याच्या शेड मध्ये बेकायदेशीर गोमान्स विक्री चालू असताना शहर पोलिसांनी छापा टाकून गोमान्स सहा तराजू काटा लोखंडी कोयता व वजन माप जप्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे.
5. कोपरगाव शहर शिवसेना युवासेनेच्या वतीने शिवजंयती उत्साहात साजरी
कोपरगाव शहर शिवसेना युवासेनेच्या वतीने आज तिथी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून सध्या पद्धतीने साजरी करण्यात आली तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करून जवळपास २००० मास्कचे वाटप यावेळी करण्यात आले.
6. शंभर वर्षांची परंपरा खंडित विरा चा पाडवा यंदा रद्द
अकोले तालुक्यामध्ये ठिकाणी वीरा चा पाडवा या पारंपारिक सणावर कोरोनाच्या संकटाने यंदा विरजण घातले धुमाळवाडी हे गाव वीरांच्या पाडव्यासाठी अकोला तालुक्यामध्ये आघाडीवर असतात त्यांच्या पाडव्याची शंभर वर्षांची ही वैभवशाली परंपरा या गावांमध्ये जोपासली जात होती.
7. राहता तालुक्यात 229 कोरणा रुग्णांची भर
लॉकडाऊन असूनही राहता तालुक्यात कोरोना रुग्नांची संख्या कमी होण्यास तयार नसून आज राहता तालुक्यात सुमारे २२९ रुग्ण आढळून आले आहेत.
8. श्रीरामपूर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा खडाजंगीत संपन्न
श्रीरामपूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा ही ऑनलाईन झाली यावेळी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये अनेक मुद्यांवरून चांगलीच खडाजंगी झाली सत्ताधारी हे विरोधकांना बोलू न देता आणि विरोधकांचे काम न करत असल्याचे आरोप यावेळी करण्यात आले.
9. आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्यास यश
अलिकडील काळातील वाढती लोकसंख्या पाहता जामखेड ग्रामीण रुग्णालय आरोग्य सुविधा पुरविण्यात अपूरे पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच तालुक्यातील जनता आणि लोकप्रतिनिधीच्या मागणी नुसार पाठपुरावा करत आ. रोहित पवार यांनी विशेष बाब म्हणून जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात यश मिळविले आहे.
No comments
Post a Comment