Breaking News

1/breakingnews/recent

22 एप्रिल Good Morning सह्याद्री

No comments

 News24सह्याद्री - नागरिकांनो नियमांचे पालन करा - प्राजक्त तनपुरे........पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. नागरिकांनो  नियमांचे पालन करा;-  प्राजक्त तनपुरे  
राज्यात कोरोनाच सावट असताना, रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी  राज्यसरकारने २२ एप्रिल ते १ मी पर्यंत लॉकडाऊन जाहीर केलं आहे. त्या अनुषन्गाने  राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नागरिकांना नियमांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन  केले आहे.    
  
2. 'ब्रेक द चेन'चे अधिक कडक निर्बंधांचे आदेश जाहीर
राज्यात आज  संध्याकाळी आठपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे कडक निर्बंध असणार आहेत. राज्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. 

3. कच्च्या मालाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा  
 लातुरात कच्च्या मालाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे .कच्च्या मालाची मागणी करण्यात येत असूनही पुरवठा करण्याचे अधिकार आता FDA कडे असल्याने ऑक्सिजन उत्पादक हतबल झाले आहेत.

4. वीज गेली जनरेटर सुरुच झाले नाही
 लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डेडिकेटेड कोविड रुग्णालयातील वीज मंगळवारी रात्री गेली. त्यातच तेथे असलेले जनरेटर सुरु झाले नाही. त्याचा परिणाम येथे आयसीयूमधील व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. 

5. एकाच रूग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोनाची लागण
 पाटणा एम्समध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. एम्समध्ये 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय.पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितलं आहे.

6. राज्यात आज विक्रमी 67,438 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ,
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. आज 67 हजार 468 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 54 हजार 985 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 32 लाख 68 हजार 449 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

7. नाशिकमधील दुर्घटनेतील मृतांचा आकडा 24 वर
नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. 

8. ओडिसातील कलाकाराने साकारली सर्वात लहान आकाराची प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती
देशभरात हा राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या राम नवमीच्या उत्सवावरही नवी कोरोनाचं सावट आहे. देशभरात कोरोनाच्या सावटात यंदाचा राम नवमी उत्सव साजरा केला गेला. ओडिसा येथील एका कलाकराने रामनवमीचे औचित्य साधून श्रीरामाची 4.1 सेमी. उंचीची एक लाकडी मूर्ती तयार केली. 

9. घरोघरी जाऊन कोरोनाची लसीकरण मोहिम अशक्य
लसीचा शरीरावर होणारा प्रभाव आणि मोठ्या प्रमाणात लस वाया जाण्याची शक्यता अशा विविध कारणांमुळे घरोघरी जाऊन लसीकरण मोहिम राबविणं शक्य नाही. अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून बुधवारी प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *