21 एप्रिल सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - नेवासा पोलिस ठाण्यातील कर्मचारी कोरोनाला हरवून पुन्हा कर्तव्यावर...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. नेवासे पोलिस ठाण्यातील कर्मचारी कोरोनाला हरवून पुन्हा कर्तव्यावर
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी झुंजणाऱ्या पोलिसांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. नेवासे पोलिस ठाण्यातील जवळपास निम्मे अधिकारी कर्मचारी कोरोनावर मात करून पुन्हा एकदा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. पोलिस निरीक्षकही कोरोनावर विजय मिळवून गेल्या दोन दिवसांपासून सेवेत हजर झाले आहेत.
2. पाथर्डीत सर्व सुविधायुक्त कोविड सेंटर सुरू करू : आमदार राजळे
पाथर्डी शेवगाव तालुक्यात वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. आदि फाउंडेशन,तालुका खरेदी विक्री संघ व नगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते आप्पासाहेब राजळे मंगल कार्यालयात सर्व सुविधांनी युक्त कोविड सेंटर चार दिवसांत सुरू करणार असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.
3. जामखेड शहरात रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार
जामखेड तालुक्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्श्नची गरज भासत आहे. परंतु जामखेड तालुक्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू असून रेमडेसीविर इंजेक्शन तीस ते पस्तीस हजार रुपयाला मिळत आहे.
4. कोपरगावात जीवनावश्यक वस्तुंची घरपोहोच सेवा
वाढत्या कोरोनाची साखळी तुटावी म्हणून गेल्या चार दिवसांपासून समताचे आठ कोरोना योद्धे मोठ्या हिमतीने जीवावर उदार होऊन कोपरगावकरांना विनामूल्य घरपोहोच सेवा देत आहेत. येथील समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा उपक्रम शहरात राबवला जात आहे. त्याच सर्वत्र कौतुक होत आहे
5. विवाहित तरूणीचा शारीरीक व मानसिक छळ
घर बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावेत या मागणीसाठी शितल चावरीया या विवाहित तरूणीचा शारीरीक व मानसिक छळ करण्यात आलाय. या त्रासाला कंटाळून त्या तरूणीने राहुरी पोलिसात धाव घेत आपल्या पतीसह सासरच्या पाच लोकांवर गुन्हा दाखल केलाय.
6. १ मे पर्यंत लाॅकडाऊन
लोणी येथे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य कोरोना व्यवस्थापन समिती यांनी आमदार श्री राधाकृष्ण विखे-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील, अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हीड-१९ संदर्भात कडक अंमलबजावणी सुरुवात केली असुन शासनाने १ मे २०२१ पर्यंत अखेर लाॅकडाऊन संदर्भात आदेश दिले आहेत.
7. खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे
अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यात कलम 144 लागू असताना शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पिंपरी निर्मळ शिवारात चारशे केवी महावितरण केंद्राजवळ बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन व कोरोनाचे गांभीर्य लक्षात न घेता साथरोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी राहाता तालुक्यातील लोणी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला
8. खून दरोडा तील कुख्यात आरोपी अटकेत
अहमदनगर आणि बीड जिल्ह्यात खून तसेच दरोडा यासारखे गंभीर गुन्हे करणार्या कुख्यात टोळीतील आरोपी राजेंद्र ह म्या चव्हाण याला श्रीगोंदे पोलिसांनी पेडगाव शिवारात कोम्बिंग ऑपरेशन करत ताब्यात घेतले
9. तहसीलदारांच्या वाहनाला अपघात
शेवगाव च्या तहसीलदार अर्चना पागिरे भाकड यांच्या खाजगी वाहनाला अपघात होऊन त्यात त्या जखमी झाले आहेत हा अपघात माका येथील खर्याचा ओढा येथे घडला याबाबत समजलेली माहिती अशी की शेवगाव च्या तहसीलदार अर्चना पागिरे त्यांच्या खाजगी वाहनाने शेवगाव येथे जात होत्या.
10. 38 गुन्हे दाखल असलेली टोळी जेरबंद
गेल्या चार महिन्यांपासून नेवासा परिसरात दरोडे जबरी चोरी घरफोड्या करून धुमाकूळ घालत असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी नेवासा पोलिसांनी जेरबंद केली या टोळीवर विविध पोलिस ठाण्यात तब्बल 38 गुन्हे दाखल आहेत या सराईत गुन्हेगारांना पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या तपास पथकाने जेरबंद केले
No comments
Post a Comment