21 एप्रिल Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - एफडीए आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली........पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्यांना सल्ला
देशभरात कोरोना वेगाने फैलावत असून, संपूर्ण देश करोनाशी पूर्ण ताकदीने लढत आहे. मात्र, राज्यांनी टाळेबंदी टाळण्याचा प्रयत्न करावा. अखेरचा उपाय म्हणून टाळेबंदीकडे पाहावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यांना दिला. स्थलांतरित मजुरांनाही आश्वस्त करण्याचे आवाहन मोदी यांनी राज्यांना केले.
२. अमेरिकेतील नागरिकांना भारतात येण्यास बंदी
भारतात करोना विषाणूची दुसरी लाट चालू असून नागरिकांनी भारतात जाऊ नये, असे आवाहन अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना केले आहे. सेंटर फॉर डिसीज अँड कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वैज्ञानिक माहितीवर आधारित प्रवास सूचना अमेरिकेत वेळोवेळी जारी करण्यात येत असतात.
३. मुंबईत नवी 61 लसीकरण केंद्रे
केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केल्यामुळे पालिकेनेही तातडीने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मुंबईत पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वे लाइनवरील स्टेशन परिसरात लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
4. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
पदोन्नतीच्या कोट्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांसाठीची ३३ टक्के आरक्षित पदे रिक्त ठेवून खुल्या प्रवर्गातील अन्य सर्व रिक्त पदे २५ मे २००४ च्या सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
५. 44 लाख डोसचे नुकसान
देशातील अनेक भागांत कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असतानाच लाखो डोस वाया जात असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. देशभरात पुरवठा केलेल्या एकूण लसींपैकी तब्बल 44 लाख 78 हजार डोस वापराविना फेकून दिले गेले.
6. मिरजेजवळ सापडला पेशवेकालीन शिलालेख
मिरजेपासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या बेडग येथे ऐतिहासिक बावाच्या विहिरीमध्ये पेशवेकालीन शिलालेख आढळला आहे. इ.स. १७९३ मधील या शिलालेखाचे लेखन देवनागरीमध्ये केले आहे.
७. महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्याची ठाकरेंची घोषणा
राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील.
८. एफडीए आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली
एफडीए आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, विक्रीकर आयुक्त परिमल सिंग यांच्याकडे आयुक्तपदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून गेले काही दिवस सुरू असलेल्या गदारोळात काळे यांची बदली झाली आहे.
९. 70 हजार रुग्णांचे वाचणार प्राण
अब्जाधीश मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्या जामनगर ऑईल रिफायनरीमध्ये दररोज 700 टनांहून अधिक मेडिकल-ग्रेड ऑक्सिजन तयार करत आहे. कोरोनात दुष्काळग्रस्त राज्यांना हे ऑक्सिजन विनाशुल्क दिले जात आहे.
१०. दिल्लीचा मुंबईवर 6 विकेट्सने विजय
अटीतटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबई इंडियन्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 138 धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीने हे विजयी आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं आहे. दिल्लीकडून ‘गब्बर’ शिखर धवनने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर स्टीव्ह स्मिथने 33 धावांची खेळी केली.
No comments
Post a Comment