19 एप्रिल सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - संजय गायकवाडांना देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं पुण्यात निधन
ख्यातनाम दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं आज सकाळी सव्वासात पुण्यात सह्याद्री रुग्णालयात निधन झालं आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या १० दिवसांपासून त्या आयसीयूमध्ये होत्या. आज त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या कासव चित्रपटाला २०१६ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
२. "महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा थांबवला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांडय़ा लावाव्या लागतील"
महाराष्ट्रात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान 'प्राणवायू'चे राजकारण झालेय तसे रेमडेसिवीरचेही राजकारण सुरू आहे. महाराष्ट्र सरकारला हे इंजेक्शन हवे, ते त्यांना मिळत नाही, पण महाराष्ट्रातील भाजपचे उपरे पुढारी त्या औषध कंपन्यांकडून परस्पर रेमडेसिवीरचा साठा विकत घेतात, त्या कंपन्या हा साठा त्यांना परस्पर उपलब्ध करून देतात हा अपराधच आहे.
3. कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर बलात्काराचा प्रयत्न
देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक भयंकर घटना समोर आली आहे. रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर असणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
४. संजय गायकवाडांना देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर
राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार उडालेला असताना आणि सर्वसामान्य जनता त्रस्त असताना राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका आणि आरोप-प्रत्यारोपांचे सत्रही जोरात सुरू आहे. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी 'मला कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते.
5. मृत्यू संख्येत मोठी वाढ
करोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरूच असून, जवळपास सर्वच राज्यांमध्ये करोनानं हातपाय पसरले आहेत. सगळीकडे रुग्ण आणि नातेवाईकांची बेड आणि ऑक्सिजनसाठी धडपड सुरू असून, आरोग्य व्यवस्थेची झोप उडवणारी रुग्णवाढ सोमवारी समोर आली आहे.
6. आरोग्य योद्ध्याचं विमा छत्र मोदी सरकारनं काढलं
देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मागील काही दिवसांपासून २४ तासांमध्ये दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचारी दिवसरात्र काम करताना दिसत आहे. असं असतानाच दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने करोना कालावधीमध्ये कामावर असतानाच प्राण गमावलेल्या करोनायोद्ध्यांना देण्यात येणारं ५० लाखांचा विमा सुरक्षा देणारी योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
7. हरीयाणाच्या आरोग्य मंत्र्यांनी मांडली लॉकडाउनवर भूमिका
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्य करोनाच्या संकटाला तोंड देत असून, आरोग्य व्यवस्था बिकट स्थितीतून जात आहे. बेडसह इतर सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यांनी आता निर्बंध लादण्यास सुरूवात केली आहे.
8. राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय
करोना रुग्णसंख्येत झालेल्या वाढीमुळे अनेक राज्यांमधून मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने राज्यांमध्ये आरोग्य व्यवस्था ढासळण्याची भीती असून केंद्राकडे मदत मागितली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर बंदी आणली आहे. यामधून नऊ उद्योगांना वगळण्यात आलं आहे.
9. लसीकरण गतिमान करण्याची गरज
करोनास्थिती हाताळण्याबाबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी करोना साथीशी लढण्यासाठी लसीकरणाची गती वाढवणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे. तसेच लसपुरवठय़ास चालना देण्यासाठी एचआयव्ही-एड्सच्या औषधांप्रमाणे परवाना अनिवार्य करण्याच्या दृष्टीने वेगाने पावले उचलावीत.
10. करोनामुळे अर्थव्यवस्थेवर अनिश्चिततेचे सावट
कोरोना विषाणू साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अनिश्चिततेचे सावट असून ग्राहक आणि गुंतवणूकदार या दोन्ही पातळ्यांवर हे चित्र आहे. त्याला तोंड देण्यासाठी आपण तयार असले पाहिजे. वेळ पडली तर सरकार आर्थिक मदत योजना जाहीर करू शकते, असे निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी रविवारी सांगितले.
No comments
Post a Comment