19 एप्रिल सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - देवेंद्र फडणवीसांची चौकशी करण्याची मागणी...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. रुग्ण वाढल्यामुळे राज्यात आरोग्य सुविधा तोकडी पडत आहे.
याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात एक हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे एका कोरोनाग्रस्ताचा उपचार न मिळाल्यामुळे बसस्थानकावरच मृत्यू झाला आहे. बसस्थानकावरच या रुग्णाने तडफडून प्राण सोडला आहे.
२. तातडीने संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा: संजय राऊत
कोरोनामुळे देशात अभूतपूर्व आणि युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने संसदेचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी सोमवारी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले.
३. देवेंद्र फडणवीसांची चौकशी करण्याची मागणी
रेमडेसिविरच्या साठेबाजीप्रकरणी मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पहायला मिळालं. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांनी रात्रीच पोलीस स्टेशन गाठलं आणि संताप व्यक्त केला.
४. कोरोना सेवकांच्या कुटुंबीयांना महापालिकेने प्राधान्य देण्याची मागणी
कोरोना महामारीच्या काळात आरोग्य सेवक जिवाची पर्वा न करता सेवा करीत आहेत. आतापर्यंत विविध जाती धर्मांतील 71 मृतदेहांचे विधीवत मोफत अत्यंविधी केले. आजही कोणतेही शुल्क न घेता काम सुरू आहे. मात्र, थेट संपर्कामुळे आम्हा सेवेकांना आणि आमच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.
५. महापौर पेडणेकर वॉर रुममधील कर्मचाऱ्यांवर भडकल्या
नागरिकांचे फोन न उचलणाऱ्या आणि त्यांना मदत न करणाऱ्या वॉर रूममधील कर्मचाऱ्यांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज चांगलंच धारेवर धरलं. मुंबईकर आधीच त्रस्त आहेत. त्यात त्यांना अधिक त्रास द्याल तर याद राखा, तुमची खैर करणार नाही, असा दमच किशोरी पेडणेकर यांनी भरला.
६. रुपाली चाकणकरांची मोठी मागणी
मुंबई पोलिसांनी ब्रूक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतल्याचं कळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली होती. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे.
७. बाळासाहेब थोरातांनी पियुष गोयल यांना फटकारले
कोरोनाच्या काळात ठाकरे सरकार हे निर्लज्ज राजकारण करत आहे. देशातील सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे.
८. मराठमोळ्या अभिनेत्रीने व्यक्त केला संताप
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं लिहिलं, 'सगळ्यात मोठी कीड आपल्या देशाला, आपल्याच नाही तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे राजकारण. ही कीड कोविडपेक्षाही भयाण, घातक आणि वर्षानुवर्ष आपल्याला पोखरत जाणारी आहे.
९. कोरोनामुळे दुग्धव्यवसाय अडचणीत
कोरोनामुळे शेतीशी निगडीत उद्योगधंदे इंदापूर तालुक्यासह इतर ग्रामीण भागात प्रचंड अडचणीत सापडले आहेत. याचा फटका दूध व्यवसायाला देखील बसला आहे. पुणे जिल्ह्यात इंदापूर सह सर्व तालुक्यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. याच दुधाचा दर 1 एप्रिल ला 3.5 फॅट आणि 8.5 एस एनफसाठी प्रतीलिटर 28 रुपये दर होता. नंतर हाच दर 26.5 प्रतिलिटर झाला.
१०. वर्धा जिल्ह्यात दुपारी 2 पर्यंतच बँकेत सुरू राहणार
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी संचारबंदी लागू करत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र अशा स्थितीतही बँकांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे आता वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या सर्व बँकांमध्ये ग्राहक सेवेच्या व्यवहाराची वेळ दुपारी 2 वाजेपर्यंतच केली आहे. आजपासूनच हा आदेश लागू होणार आहे.
No comments
Post a Comment