19 एप्रिल सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - चाचणी रिपोर्टशिवाय मजुरांना मिळेना काम...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सर यांचा भारत दौरा रद्द
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा अखेर रद्द करण्यात आला आहे. या आठवड्यात जॉन्सन भारत दौऱ्यावर येणार होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राजधानी दिल्लीमध्ये आठवड्याभराचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आज रात्री 10 पासून दिल्लीमध्ये लॉकडाऊन असणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान रविवारपासून भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यावर येणार होते.
2. इस्त्रायल झाला मास्क फ्री; ठरला जगातील पहिला देश
जगात कोरोना महामारीचे थैमान सुरुच आहे. 2020 मध्ये अख्या जगाला वेठीस धरलेल्या कोरोना महामारीने 2021 मध्येही आपला प्रकोप सुरुच ठेवला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट आली आहे. त्यामुळे लोकांना वारंवार हाथ धुणे, मास्कचा वापर करणे अशा कोरोना नियमांचे पालन करावे लागत आहे.
3. धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी
गेल्या वर्षभरापासून संपर्णू देशासह महाराष्ट्रात कोरोनोच्या परिस्थितीत अनेक प्रश्न उपस्थित होत असताना व शासकीय यंत्रणेवर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला असताना देखील राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अशा बिकट परिस्थितीत विभागास प्राप्त झालेल्या निधीचा संपूर्ण खर्च करण्याची रेकॉर्डब्रेक कामगिरी बजावली आहे.
4. नाशिकच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधील नामांकित रुग्णालयात उघड झाला आहे. मयत महिला रुग्णाच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी झाल्याचा आरोप तिच्या मुलाने केला आहे. तर या प्रकरणात नाशिक शहरातील स्पंदन हॉस्पिटल विरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5. पोलीस उपनिरीक्षकावर कोयता व विटाने हल्ला
पुण्यातील गाडीतळ पोलीस चौकीच्या हद्दीत लावलेले सीसीटीव्ही चोरणाऱ्यांना पकडण्यासाठी गेलेल्या फरासखाना पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला तसेच पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच पथकावर वीटही फेकून मारण्यात आली.
6. चाचणी रिपोर्टशिवाय मजुरांना मिळेना काम
वानवडीतील पालिकेच्या रोजंदारीवरील कामगारांना करोना निगेटिव्ह रिपोर्टशिवाय काही काम मिळत नसल्याने विलासराव देशमुख क्रीडा प्रबोधनी येथे सुरू करण्यात आलेल्या चाचणी केंद्रावर रिपोर्टसाठी कामगारांची गर्दी होत आहे.
7. कोरोना काळात विकसित झाला लोकसहभागाचा बारामती पॅटर्न
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी एकीकडे प्रशासन स्तरावर उपाययोजना सुरु असताना बारामतीत मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने लोकसहभागातून मोठे काम उभे राहिले आहे. हा बारामती पॅटर्न राज्यभर राबविला तर कोरोना रुग्णांना निश्चित दिलासा मिळू शकतो. संकटात बारामतीकर एक होतात आणि त्या संकटाला एकदिलाने सामोरे जातात हे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले.
8. कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांना आता दोन महिन्यांची सुट्टी..
कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना घरोघरी जाऊन सर्व्हे करणे, कोरोना नियंत्रण कक्षातील ड्यूटी आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची जबाबदारी दिली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याने आता माध्यमिक शिक्षकांचीही मदत त्यासाठी घेतली जाणार आहे.
9. "गृहमंत्री बदलूनही हफ्ते वसुली चालू असेल तर आता पर्याय काय काढणार?"
गृहमंत्र्यांच्या नावाने बार्शी पोलिसांनी आपल्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली, असा धक्कादायक आरोप सोलापुरातील व्यापाऱ्याने केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.गृहमंत्री बदलूनही हफ्ते वसुली चालू असेल तर आता पर्याय काय काढणार?, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
10. सर्वत्र रंगली दीपक हुडाच्या 'सोडपकड' कॅचची चर्चा
रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघ हंगामातील त्यांचा दुसरा विजय नोंदवण्यात यशस्वी ठरला आहे. काल मुंबई येथे पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या हंगामातील अकराव्या सामन्यात त्यांनी ६ विकेट्सने बाजी मारली आहे.
No comments
Post a Comment