19 एप्रिल सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - दातीर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. पारनेर तालुक्यांमध्ये कोरोना
संदर्भात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत तरीही काही दुकानदार ग्राहकांना समोरून शटर बंद करून आत मध्ये मालाची विक्री करताना आढळले तहसिलदार ज्योती देवरे व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या पथकाने रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास अचानक धाड टाकत दुकानदार बेसावध असताना कारवाई केली असून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
2. कर्जत शहरातील गदादे नगर येथे चोरी
कर्जत शहरातील गदादे नगर येथील शिवाजी मोहन दंडे याच्या घरी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी करून ७५०००/हजार रूपायाचा एैवज चोरून नेला आहे. याबाबत कर्जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
3. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राधावल्लभ कासट यांचे हृदयविकाराने निधन
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, संगमनेर नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष,नगर अर्बन बँकेचे संचालक राधावल्लभ कासट यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन..
4. दातीर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या
राहुरी शहरातील पत्रकार रोहिदास दातीर यांची ६ एप्रिल रोजी अपहरण करून हत्या झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यापूर्वीच दोन आरोपींना जेरबंद केलेले आहे. मात्र, मुख्य आरोपी कान्हू मोरे व अक्षय कुलथे हे गेल्या बारा दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होते.
5. संगमनेर-अकोले असा भेदभाव कधीही केला नाही
अकोले : संगमनेर- अकोले असा कधीही दुजाभाव केला नाही, करणार नाही अन् होऊही देणार नाही. रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असलेले रुग्ण लक्षात घेऊन योग्य वाटप केले गेले आहे.
6. भाजपच्या कार्यकर्त्यांकडे ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शन आले कोठून
युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे जेथे सर्वसामान्य लोकांना रेमडेसिविरचे एक इंजेक्शन मिळविण्यासाठी नाकीनऊ येतात, तेथेच भाजपच्या कार्यकर्त्यांकडे पन्नास हजार इंजेक्शन येतात कोठून?’ असा सवाल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला. ‘आज सर्वसामान्यांवर ऑक्सिजनसाठी सोनं विकण्याची वेळ आली असून यासाठी केंद्रातील भाजपचे सरकारच कारणीभूत आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.
7. कोरोनामुळे वरखेडची यात्रा सलग दुसऱ्या वर्षीही रद्द
देशभरातील मतांगसमाजाचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील श्रीक्षेत्र वरखेड येथील श्रीमहालक्ष्मी मातेचा २ मे रोजी होणारा यात्रा महोत्सव कोविड १९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आल्याच यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी देखील राज्यातील भाविक स्वयंभू असलेल्या नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या वरखेड येथील श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला मुकणार आहे.
8. लॉकडाऊन मुळे हा होणारं फायदा ; मंत्री बाळासाहेब थोरातांनी दिले स्पष्टीकरण
कोरोना बाधित झाल्यानंतर साधारण सात दिवसानंतर आपल्याला त्याचे परिणाम दिसायला लागतात तुम्ही लोक डाऊन काटेकोर पाळलं सगळ्यांनी ,प्रशासनान आपल्या पाठीशी आहे जनतेने मनावर घेतलं जनता कर्फ्यू झाला पहिले सात दिवस काही फरक कदाचीत दिसणार नाही परंतु त्याचा फरक सात दिवसांत 14 दिवसांनी खूप चांगले रिझल्ट्स येतील असे सूत्र आहे.
9. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेवगाव येथे गोरगरिब नागरिकांसाठी मोफत जेवण थाळी पार्सल
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेवगाव व पंचायत समिती सभापती डॉ क्षितिज भैय्या घूले यांच्या वतीने क्रांती चौक शेवगाव येथे गोरगरिब नागरिकांसाठी मोफत जेवण थाळी पार्सल जेवण देण्यात येत असुन अनेकजण त्याचा लाभ घेताना दिसत आहेत.
No comments
Post a Comment