Breaking News

1/breakingnews/recent

19 एप्रिल Good Morning सह्याद्री

No comments

   News24सह्याद्री - देशभरातून राज्यात रेल्वेने ऑक्सिजनचा पुरवठा होणार!........पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट



TOP HEADLINES


1. लसीकरण गतिमान करण्याची गरज
करोनास्थिती हाताळण्याबाबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी करोना साथीशी लढण्यासाठी लसीकरणाची गती वाढवणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे. तसेच लसपुरवठय़ास चालना देण्यासाठी एचआयव्ही-एड्सच्या औषधांप्रमाणे परवाना अनिवार्य करण्याच्या दृष्टीने वेगाने पावले उचलावीत, अशी सूचनाही मनमोहन यांनी केली आहे.

2. देशभरातून राज्यात रेल्वेने ऑक्सिजनचा पुरवठा
 राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे नव्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे. हजारोंनी रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडतो आहे. वेगवेगळी औषधं, रेमडेसिव्हीर इंजेक्शन याबरोबरच ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा राज्यात भासत आहे.

3. २४ तासांत दीड हजार बळी
देशात करोनाचा वेगाने फैलाव सुरू असून, रविवारी दैनंदिन रुग्णसंख्या आणि करोनाबळींच्या संख्येने नवा उच्चांक नोंदवला. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे २,६१,५०० रुग्ण आढळले, तर १,५०१ रुग्णांचा मृत्यू झाला.
देशात दैनंदिन रुग्णसंख्येत सलग ३९ व्या दिवशी वाढ नोंदविण्यात आली. 

4. चंद्रकांत पाटील कडाडले
ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशीप्रकरणी भाजप नेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. त्यांच्या या इशाऱ्याची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. खुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाहीत. 

5. कुंभमेळा यात्रेकरूंना दिल्ली, ओडिशात सक्तीचे विलगीकरण
करोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असतानाच, कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांमुळे हा विषाणू प्रचंड वेगाने पसरू शकतो या भीतीमुळे यावर्षीचा कुंभमेळा वादाचे केंद्र ठरला आहे. 

6. क्रिडा मंत्री यांच्याकडून सिडको वाळूजमहानगर स्टेडियमची पाहणी
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत आसलेल्या गोलवाडी शिवारात सिडको वाळूजमहानगर-४ मधील स्टेडियमला क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी या अचानक भेट देऊन पाहणी केली. या प्रसंगी स्टेअियमचे क्रिडा विभागाकडे हस्तांतरण करण्यासंदर्भात सिडकोचे अधिकारी व क्रिडा विभागाच्या उपसंचालक उर्मिला मोराळे यांच्याशी मंत्री केदार यांनी चर्चा केली. 

7. रेमडेसिविरवरून राजकारण
रेमडेसिविरच्या पुरवठय़ावरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शनिवारी कलगीतुरा रंगल्याच्या पार्श्वभूमी वर रविवारी वादाचा दुसरा अंक रंगला. रेमडेसिविरच्या साठेबाजीप्रकरणी मुंबई पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री एका औषध कंपनीच्या संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी पोलीस ठाणे गाठले. 

8. स्क्रॅप च्या टायर गोडाऊनला आग
औरंगाबाद वाळूज एमआयडीसी परिसरात  वाळूज गावा शेजारी औरंगाबाद अहमदनगर महामार्गावर माईन स्टोन हॉटेल समोर सेफ ट्रेडर्स या स्क्रॅप च्या टायरच्या गोडाऊनला  शॉर्ट सर्किट मुळे आग लागली
  या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. 

9. डोंबिवलीत रिस्पॉन्स दुकानाला भीषण आग
डोंबिवलीत मानपाडा येथील रिस्पॉन्स दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे हि आग  इतकी भीषण होती की यामध्ये बाजूची दुकाने देखील जाळून खाक झाली आहेत  आहे.

10. लातूरमध्ये पोकलेनचा विचित्र स्फोट
लातूर  जिल्ह्यातील देवकरा गावाच्या शिवारात रात्री विचित्र घटना घडली आहे. या गावातील प्रभाकर मुरकुटे यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरु होते. यासाठी पोकलेनची मदत घेण्यात येत होती. पोकलेनच्या मदतीने काम जलद गतीने करावे असा त्यांचा विचार होता. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *