Breaking News

1/breakingnews/recent

25 मार्च सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24सह्याद्री - खासदार सुप्रिया सुळे आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. अनिल देशमुख यांचं मध्यरात्री ट्विट
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांचं नाव चर्चेत आहे. एकीकडे या आरोपांवरुन राज्यातील राजकारणात खळबळ माजली असताना दुसरीकडे परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत सीबीआय चौकशीची मागणी केली. 

2. रुग्णांच्या नातेवाइकांची ‘प्लाझ्मा’साठी धावपळ
राज्यापाठोपाठ शहरातील रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना रुग्णांच्या नातेवाइकांची रक्तद्रव (प्लाझ्मा) मिळवण्यासाठी दमछाक होत आहे, 

3. रायगड जिल्ह्यात गिधाडांचा अधिवास घटला
रायगड जिल्ह्यातील गिधाडांचा अधिवास मोठ्या संख्येनी घटला आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर जिल्ह्यातील गिधाडांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले असण्याची शक्यता पक्षी निरीक्षक आणि अभ्यासकांनी वर्तवली आहे. 

4. भारतात ५३ हजार ४७६ नव्या रुग्णांची नोंद
भारतात गेल्या २४ तासात ५३ हजार ४७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या पाच महिन्यात ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. यासोबतच भारतातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ वर पोहोचली आहे.

5. महाविकास आघाडीचे नेते आणि राज्यपालांची भेट टळली
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज  महाविकास आघाडी सरकारमधील नेते राज्यपालांची भेट घेणार होते. 

 6. Aadhar Card लिंक न केल्यास Pan Card होणार बंद
केंद्र सरकारने आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलंय. आता येत्या 31 मार्चपर्यंत पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड बंद पडू शकते. 

7. खासदार सुप्रिया सुळे आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक
सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारवर अनेक आरोप होत आहेत, या पार्शवभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची चर्चां झाली आहे. स्वतः सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे

8.  पुण्यात बापाची दोन लेकींसह आत्महत्या
दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. मोबाईल, पैसे विहिरीच्या काठावर काढून ठेवून पित्याने लेकींसह जीवनयात्रा संपवली. 

9. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत विजयी
इंग्लंडच्या संघाविरोधात सुरु असणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या पहिल्या सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. 

10. सोन्याचा भाव 1000 रुपयांनी वधारला
गेल्या काही दिवसात सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचं दिसत असताना बुधवारी संध्याकाळी बाजार बंद होत असताना सोन्याच्या भावाने उचल खाल्ली आहे. बुधवारी संध्याकाळी सोन्याच्या भावात एक हजारांची वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *