20 मार्च सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री -
TOP HEADLINES
1. आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर शिवरायांची प्रतिष्ठापना
वरळी-कोळीवाडय़ातील अक्षय जंगम या गिर्यारोहक तरुणाने इतिहास घडवलंय. आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट किलीमांजारोवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्याने केली .
2. दिल्ली हायकोर्टाचा फ्युचर ग्रुपला झटका
दिल्ली हायकोर्टाने फ्युचर ग्रुपला मोठा झटका दिला आहे. फ्युचर रिटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या 24 हजार 713 कोटींच्या व्यवहाराला स्थगिती दिली आहे.
3. दिल्लीतील घरपोच रेशन योजनेला केंद्राचा ब्रेक
दिल्ली सरकारच्या घरपोच रेशन योजनेला केंद्र सरकारने सुरू होण्याआधीच ब्रेक लावला आहे. देशातील नागरिकांना रेशन देण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार धान्य उपलब्ध करून देते.
4. मध्य - उत्तर महाराष्ट्र पुढील 48 तासात पाऊस
मध्य महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 48 तासांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
5. सीबीआयच्या तपासणीत सरकारी कार्यालये रडारवर
सीबीआयने शुक्रवारी दक्षता विभागाच्या सहकार्यातून भ्रष्टाचाराविरोधात संयुक्त मोहीम राबवली. त्या विशेष मोहिमेवेळी देशभरातील सरकारी कार्यालयांची अचानकपणे तपासणी करण्यात आली.
6. मुंबईला 9 नवे न्यायाधीश मिळणार
मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असून मुंबईला 9 नवे न्यायाधीश मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आली.
7. दिल्लीहून लखनौ येत असलेल्या शताब्दी एक्सप्रेसच्या लगेज बोगीला आग
उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील गाझियाबाद स्थानकात गोंधळ उडाला जेव्हा दिल्लीहून लखनऊला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेस गाडीच्या एका सामानाच्या बोगी कारला अचानक आग लागली.
8. भारत-इंग्लंड निर्णायक लढत आज
भारत विरुद्ध इंग्लंड आज निर्णायक लढत होणार आहे. मालिकेत दोन्ही संघांनी 2-2ने आघाडी घेतली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी -२० मालिकेचा शेवटचा आणि निर्णायक सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजल्यापासून खेळला जाणार आहे.
9. मराठवाड्याला अवकाळी पावसाने झोडपले
राज्यात कोरोनाच्या संकटाने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या समोर नवे संकट उभे राहिले आहे. आज पहाटे मराठवाड्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
10. राजीनाम्याच्या चर्चांवर अनिल देशमुख यांचे महत्त्वाचे ट्विट
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेली स्फोटक यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणी वाढल्या असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
No comments
Post a Comment