Breaking News

1/breakingnews/recent

19 मार्च सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24सह्याद्री - उत्तर प्रदेशमध्ये विक्रमी सामुदायिक विवाह...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. महाराष्ट्रात रुग्णसंख्येचा उच्चांक
महाराष्ट्राच्या चिंतेत गुरुवारी मोठी भर पडली. करोना संकट गडद झाल्याची जाणीव काल (१९ मार्च) सायंकाळी आलेल्या आकडेवारीने सरकारला आणि जनतेला करून दिली. 

2. जळगावात भाजपच्या सत्तेला सुरुंग
जळगाव महापालिकेत भाजपच्या एकहाती सत्तेला शिवसेनेने सुरूंग लावला असून सांगलीनंतर दुसरी महापालिका भाजपला गमवावी लागली आहे.

3. डहाणू किनारपट्टीच्या गावांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य दिसत आहे.
विव्वळवेढे ग्रामपंचायतच्या हद्दीतील महालक्ष्मी गडाच्या पायथ्याखालच्या बावळपाडा येथील रहिवाशांना पाण्यासाठी शेतात खड्डे खणून तहान भागवावी लागत आहे. 

4. अलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरुंनी दिली होती लेखी तक्रार
अलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरु संगीत श्रीवास्तव यांनी पहाटे मशिदींमधील लाऊडस्पीकरचा वापर करण्याविरोधात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. 

5. उत्तर प्रदेशमध्ये विक्रमी सामुदायिक विवाह
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांचाच  भाग म्हणून गुरुवारी लखनौ शहराजवळ ३५०० हून अधिक जोडप्यांचा सामुदायिक विवाह समारंभ आयोजित करण्यात आला होता.

6. ‘एसईबीसी’चा राज्यांचा अधिकार अबाधित
सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) निश्चित करण्याचा राज्यांचा अधिकार, संविधानातील १०२ व्या दुरुस्तीनंतरही अबाधित राहतो, असा युक्तिवाद महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीदरम्यान केला.

7. वर्षभरात टोलनाके बंद
देशभरातील सर्व टोलनाके वर्षभरात काढून टाकण्यात येणार असून, ‘जीपीएस’च्या आधारे टोल आकारणी आणि वसुली केली जाईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते-वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिली.

8. देशात ३५,८७१ करोनाचे नवे रुग्ण
देशात गेल्या एक दिवसात आणखी ३५ हजार ८७१ जणांना करोनाची लागण झाली असून हा गेल्या १०० दिवसांमधील उच्चांक आहे. 

9. नासाने बनविले जगातील सर्वात ताकदवान रॉकेट
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने १.३५ लाख कोटी खर्चून स्पेस लाँच सिस्टीम रॉकेट- मेगा रॉकेट बनविले असून हे रॉकेट जगातील सर्वात ताकदवान रॉकेट असल्याचे सांगितले जात आहे. 

10. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील बससेवा वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे बंद
महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 21 मार्च पासून 31 मार्च पर्यंत मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांची आंतरराज्य बससेवा थांबवण्यात येणार आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *