Breaking News

1/breakingnews/recent

18 मार्च सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24सह्याद्री - पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. आज राज्यावर पावसाळी संकट
देशभरात उन्हाळ्याच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, तरीही महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. 

2. कोरोना संकटात भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी
देशाच्या काही भागांमध्ये करोना संसर्ग वेगाने पसरत असून, करोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी जलद व निर्णायक पावले उचलण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यांना केले.

3. ज्योतिरादित्य शिंदेंच्या ग्वाल्हेरमधील महालात दरोडा
भाजपा खासदार आणि ग्वालियरमधील राजघराण्याचे वारसदार ज्योतीरादित्य शिंदे यांच्या महालात दरोडा घालण्यात आल्याचं समोर आलं आहे. 

4. जनहितासाठी केंद्र सरकारशी शांतीवार्ता करण्याची तयारी
आदिवासींचे हित हे आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. जनतेच्या फायद्यासाठी आम्ही शांतीवार्ता करण्यास तयार आहे. 

5. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सलग 19 व्या दिवशी स्थिर राहिल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना देशात आता पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत हे विशेष.

6. पंढरपूरमध्ये उमेदवारीवरून संभ्रम
आमदार भारत भालके  यांच्या निधनाने रिक्त असलेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी उमेदवारीबाबत राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये संभ्रम आहे. 

7. दहावी-बारावी उत्तीर्णतेचा निकष ३५ ऐवजी २५ टक्के?
  राज्य परीक्षा नियोजन समितीने दहावी-बारावीच्या उत्तीर्णतेचा निकष ३५ टक्क्यांऐवजी २५ टक्के करण्याच्या शिफारशीवर गांभीर्याने विचार करणे सुरू केले आहे.

8. ऑनलाईन निवडणुकीला कोर्टाची परवानगी
जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या  तोंडावर भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. या निवडणुकीसाठी ऑनलाईन मतदान घेण्याला भाजपने  विरोध केला होता. 

9. पुण्यात एकाच दिवशी 2500 रुग्ण
पुण्यात कोरोनाचा स्फोट  झालेला पाहायला मिळतोय. काल एकाच दिवसात शहरात  2587 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येचा आकडा पाहता महापालिका प्रशासन मुळासकट हादरलं आहे.

10. विदर्भात अवकाळी पाऊस
राज्यात कोरोनाचं संकट वाढत चाललं असताना आता अवकाळी पावसाचं संकट देखील समोर उभं राहिलं आहे. आज नागपूर, वर्ध्यासह विदर्भातील काही भागात अवकाळी पावसानं विजांच्या कटकडाटासह हजेरी लावली. यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *