Breaking News

1/breakingnews/recent

17 मार्च सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24सह्याद्री - १५ हजाराची लाच घेताना प्रभागक्षेत्र अधिकाऱ्याला अटक...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. सरकारविरोधात मच्छीमार संघटना आक्रमक
ओएनजीसी व मच्छीमारांमध्ये समुद्रातील सर्वेक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा संघर्ष पेटला आहे. सर्वेक्षणाच्या काळात झालेल्या नुकसानभरपाईपोटीची ओएनसीजीने मागील पंधरा वर्षांची सुमारे 500 कोटी रुपयांची रक्कम थकवली आहे. 

2. ममता बॅनर्जींमुळे पश्चिम बंगालचा विकास थांबला; राजनाथ सिंह यांचे टीकास्त्र
गरीब, आदिवासी, दुर्लक्षित समाजासाठी केंद्र सरकारने बनवलेल्या योजना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात लागू केल्या नाहीत. त्यांच्यामुळेच पश्चिम बंगालचा विकास थांबला, अशी टीका भाजप नेते संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली.

3. जगात दिल्ली सर्वात प्रदूषित
दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर ठरले आहे. सर्वात प्रदूषित शहरांत नवी दिल्लीसह गाझियाबाद, बुलंदशहर, बिसराख, जलालपूर, नोएडा, ग्रेटर नोएडा, कानपूर, लखनौ,  सह आणखी शहरांचा समावेश आहे.

4. कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग
कल्याणच्या वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला रात्री मोठी आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4  गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. 

5. १५ हजाराची लाच घेताना प्रभागक्षेत्र अधिकाऱ्याला अटक
 एका बांधकाम प्रकरणात १५  हजार रुपयांची लाच घेताना ठाणे एसीबीने क-प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि त्यांचे सहकारी सुहास मढवी यांना सोमवारी संध्याकाळी अटक केली. 

6. मुलाच्या थपडेने आईचे जागेवर निधन
 दिल्लीच्या 'द्वारका'मध्ये एका कुपुत्राने आपल्या आईवर हात उचलला आणि त्याने मारलेल्या जोरदार थपडेने त्या 76 वर्षीय माऊलीचे निधन झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. 

7. भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू
भारतीय जनता पक्षाचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. दिल्लीतल्या आरएमएल रुग्णालयाजवळ असलेल्या खासदारांची निवासस्थानं आहेत. 

8. हुंडा प्रथेविरोधात सायकलवरून देशभ्रमंती
हुंडा घेणे किंवा देणे ही प्रथा म्हणजे आपल्या समाजाला लागलेली कीड आहे. महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी ही प्रथा बंद झाली पाहिजे, हा ध्यास घेऊन जालन्यातील भाऊसाहेब भवर हे गेल्या 27 वर्षांपासून सायकलवरून देशभर जनजागृती करतायत. 

9. महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांची सह्याद्रीवर बैठक सुरू
मुकेश अंबानींच्या घरासमोर लावण्यात आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणानंतर समोर येत असलेल्या माहितीमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. 

10. क्वारंटाइन नियम मोडणाऱ्यांना आता 'सुधारण्यासाठी' धडे
कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे खबरदारीचे नियम पाळा, असे आवाहन पालिकेकडून वारंवार केले जात असताना अनेकजणांकडून नियम मोडले जात असल्याचे समोर आले आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *