Breaking News

1/breakingnews/recent

16 मार्च सह्याद्री वेगवान आढावा

No comments

News24सह्याद्री - केंद्राने पेट्रोलमागे ३३ रुपये तर डिझेल मागे ३२ रुपयांचा महसूल कमावला...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. भारतीय रेल्वेने ३१ मार्चपर्यंतच्या सर्व ट्रेन रद्द केल्या?
कोरोना व्हायरस पुन्हा डोकं वर काढत असताना देशभरात अनेक राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाउन किंवा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

2. आर्थिक संकट ओढावल्याने शिक्षक गांजा तस्करीच्या व्यवसायात
कोरोना संकटामुळे शाळा बंद पडल्याने आर्थिक संकट ओढावलेल्या तेलंगणामधील एक शिक्षक गांजाची तस्करी करत असल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. 

3. नीट परीक्षा किती वेळा होणार? 
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी नीट परीक्षा वर्षातून एकदाच आयोजित केली जाईल, असं स्पष्ट केलं आहे. नीट परीक्षा म्हणजे राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा यंदा 1 ऑगस्टला होणार आहे. नीट परीक्षा वर्षातून अधिक वेळा घेण्यात यावी, अशी चर्चा सुरु झाली होती. 

4. पेट्रोलमागे ३३ रुपये तर डिझेल मागे ३२ रुपयांचा महसूल कमावला
सोमवारीही पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग १६ व्या दिवशी वधारलेलेच दिसून आले. असं असतानाच दुसरीकडे इंधनविक्रीमधून केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात महसूल कमवत असल्याचा खुलासा खुद्द केंद्रानेच केला आहे. 

5. मुंबई-पुण्याकडे खासगी बस वाहतूक बंद
जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून दिवसेंदिवस  नवनव्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या खासगी बसेसची वाहतूक बंद करण्यात आली.

6. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीपूर्वी वातावरण तापलं 
पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी वातावरण तापू लागले आहे. जिल्हाध्यक्षांचा आदेश झुगारत पंढरपुरात राष्ट्रवादीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

7. मुंबई पोलीस दलातील ‘त्या’ बड्या अधिकाऱ्याची चौकशी होणार
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवण्याच्या कटात सहभाग असल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून लवकरच मुंबई पोलीस दलातील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी केली जाणार आहे. या अधिकाऱ्याच्या चौकशीची परवानगी मिळवण्यासाठी NIA ने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे विचारणा केली आहे. 

8. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पुण्यात कोरोनाचा प्रसार?
एमपीएसची परीक्षा पुढे ढकल्यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळे कोरोनाचा फैलाव झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

9. पालघर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना करोना
पालघर : जव्हार तालुक्यातील हिरडपाडा येथील ४२ विद्यार्थी व सहा कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्या पाठोपाठ पालघर नंडोरे येथील नऊ विद्यार्थिनींना करोनाचा संसर्ग झाला आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *