17 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - लोणी परिसरात खळबळजनक घटना अज्ञात तरुणाचा आढळला मृतदेह....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे पहाटे दिल्लीत निधन झाले.
अहमदनगर- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास दिल्लीत निधन झाले. मंगळवारी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, त्यांना श्वास घेण्यास जास्त त्रास होत असल्याने मंगळवारी दुपारपासूनच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
2. आमदार निलेश लंके यांना महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार
राजधानी दिल्ली येथे महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला गेल्या वर्षभरात अनेक सामाजिक आणि राजकीय कामे केलेल्या कारणांची दखल घेत महाराष्ट्रातून ठराविक व्यक्तींची निवड करण्यात आली.
3. शेवगाव मध्ये विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
शेवगाव तालुक्यातील वाढत्या कोरोना बाधितांची संख्येला आळा घालण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करावे असे आव्हान शेवगाव पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी केले.
4. मंगल कार्यालयावर झाली कायदेशीर कारवाई
कोरोना विषानुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने तसेच संकल्प संकृतिक भवन या मगलकार्यालयामध्ये असलेल्या लग्न समारम्भामध्ये 50 पेक्षा जास्त लोक मिळून आले.
5. अतिक्रमण हटवण्याचे लेखी आदेश न दिल्याने आमरण उपोषण सुरू
नगर नाशिक औरंगाबाद जिल्ह्याच्या हद्दीजवळ ग्रामपंचायतीने नियमितपणे कर वसुली करून यात्रे साठी जागा उपलब्ध केली होती,मात्र त्या जागेवर मोठ्या प्रमाणात विना परवानगीने अतिक्रमण झाल्याने यात्रे साठी असणारी राखीव जागा पूर्ण संपुष्ठात आल्याने येण्याऱ्या काळात यात्रेच्या जागेची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
6. सरपंच पदी सौ अंजली लक्ष्मण ढेपे यांची बिनविरोध निवड
जामखेड तालुक्यातील महारुळी गुरेवाडी ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या अंजली लक्ष्मण ढेपे तर उपसरपंचपदी छबुराव ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली निवडीनंतर गुलालाची उधळण करत ग्रामस्थानी जल्लोश केला.
7. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील भागत कन्टेन्टमेंन्ट झोन
शहरातील वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सुभद्रानगर मधील भूषण जोशी यांचे घर ते कलविंदर डडीयाल व अनिरुद्ध काळे यांच्या घरापर्यंतचा संपूर्ण भाग कन्टेन्टमेंन्ट झोन तर उर्वरित संपूर्ण सुभद्रानगर हे बफर झोन म्हणून दि १५ मार्च ते दि २५ मार्च २०२१ ठीक रात्री १२ वाजेपर्यंत तहसीलदार योगेश चंद्रे यांनी जाहीर केले आहे.
8. तरुणावर थेट कोयत्याने हल्ला
श्रीरामपुरात एका तरुणावर किरकोळ वादाचा कारणावरून कोयत्याने खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे नगर जिल्ह्यात गुंडाराज अशी परिस्थिती निर्माण झाली कि काय.असेच वाटू लागले आहे.. यात इम्रान गंभीर जखमी झाला.
9. लोणी परिसरात खळबळजनक घटना अज्ञात तरुणाचा आढळला मृतदेह
राहाता तालुक्यातील लोणी मध्ये इरिगेशन परिसरामध्ये कॅनॉल च्या शेजारी कच्चा रोडवर अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. सदर घटनेची लोणी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली असता सदरचा मृतदेह हा अर्जुन अनिल पवार रा बारागाव नांदूर याचा असल्याचे निष्पन्न झाले.
10. पोलिस अधीक्षक यांच्या गाडीला जोराची धडक
नगर- औरंगाबाद रोडवरील एसपी ऑफिसजवळील पंचवटी हाॅटेलबाजूच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर दोन ट्रॉली घेऊन ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ने पोलीस अधीक्षकांच्या गाडीला धडक आहे. हा ट्रॅक्टर कुकडी कारखान्यास ऊस घेऊन चालला होता.
No comments
Post a Comment