16 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - संपानंतरही केंद्र सरकारला जाग आली नाही, तर यापेक्षा तीव्र अांदाेलन करणार....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. नगरमध्ये करोनाचा कहर, 559 नवे रुग्ण
नगर जिल्ह्यात आता करोनाचा कहर सुरु झाला आहे. बेजबादार नागरीकांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. काल एकाच दिवशी तब्बल 559 नवे रुग्ण सापडले असून, उपचार घेणार्यांची संख्याही आता अडीच हजार पार झाली आहे.
2. गंगामाई कारखाना विरोधात आमरण उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय
जोपर्यंत संपूर्ण मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शेवगाव तहसिल कार्यालय येथे सुरू केलेले आमरण उपोषण सोडणार नाही असा निर्धार तसेच पवित्रा शिवसंग्राम पक्षाचे शेवगाव तालुका अध्यक्ष नवनाथराव इसरवाडे यांनी केला.
3. साई संस्थानची दर्शनपास वितरण केंद्रे दुपारी बंद राहणार
साईबाबा संस्थानने शहरातील सर्व सशुल्क व मोफत दर्शन पास वितरण केंद्रे सकाळी साडे अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
4. दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात,ट्रकांचा चक्काचूर
नगर-मनमाड राज्य महामार्गावर राहुरी शहर हद्दीत दोन मालवाहतूक ट्रकची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही ट्रकांचा अक्षरश: चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी कंटेनर चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.
5. बँकांचे खाजगीकरण हा एकमेव उपाय आहे का - आ. रोहित पवार
बँकांच्या राष्ट्रीयकरणाला जवळपास बावन्न वर्षे पूर्ण होत असताना देशात सरकारी बँकांचे खाजगीकरण करण्याची तयारी सुरू आहे. सरकारी बँकाचा एनपीए वाढत असून या बँका तोट्यात चालतात, केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात बँकांना आर्थिक सहाय्य करावे लागते.
6. प्रशासनाच्या आदेशामुळे मढीत मर्यादित स्वरुपात होळी साजरी
श्रीक्षेत्र मढी येथील गावाची होळी प्रशासनाच्या आदेशामुळे मर्यादित स्वरुपात साजरी करण्यात आली. त्यामुळे होळीच्या दिवशी महाप्रसादासाठी ग्रामस्थांकडे येणारे पाहुणे व नातेवाईक कमी प्रमाणात आले. होळी सणाच्या अगोदर पंधरा दिवस देशात फक्त मढी येथे होळी सण साजरा होतो.
7. महाविकास आघाडी सरकारच्या सहकार्याने विकासकामे पूर्ण करू
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या सर्वच खात्यांचे सहकार्य मिळत आहे.
8. वृद्धेश्वर परिसरात स्वच्छता अभियान
पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे देवस्थान परिसराचा संपूर्ण भाग सुधाकर पालवे सामाजिक प्रतिष्ठानतर्फे स्वच्छ करण्यात आला. दर रविवारी दोन तास स्वच्छतेसाठी या उपक्रमांतर्गत स्व. सुधाकर पालवे सामाजिक प्रतिष्ठान घाटशिरस यांच्या वतीने हा उपक्रम राबवला जाणार आहे.
9. संपानंतरही केंद्र सरकारला जाग आली नाही, तर यापेक्षा तीव्र अांदाेलन करणार
बँकेच्या खासगीकरणाला देशातील सर्व बँक कर्मचारी संघटनांनचा तीव्र विरोध आहे. हा विरोध असतानाही सरकार खासगीकरणाचा हट्ट सोडायला तयार नसल्याने त्यास विरोध करण्यासंदर्भात बँक कर्मचाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या एनयुबीयुने सोमवार व मंगळवारी देशव्यापी संप पुकारला व तो शंभर टक्के यशस्वी झाला.
10. तरच लॉकडाऊन टाळणे शक्य- राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
कोरोणा आजाराचा नव्याने होत असलेल्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्याची गरज निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे राहुरी शहर व तालुक्यातील नागरिकांनी कोरोना संदर्भात असलेल्या प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे नागरिकांनी नियमांचे पालन करावे.
Tags:
No comments
Post a Comment