23 मार्च Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - या सरकारने किती सचिन वाझें तयार केले भाजपचा सवाल.....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEALINES
1. औरंगाबाद येथील डॉक्टरांकडून कोरोना रुग्णाचा छळ
औरंगाबाद मध्ये चिकलठाणा भागात राहणारी राधा इंगळे या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या महिलेला मेलट्रॉन सेंटर येथे उपचार घेण्यास सांगण्यात आले.
2. उल्हासनगरात दोन मंगलकार्यालयावर मनपाची दंडात्मक कारवाई
आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे.ती रोखण्यासाठी मनपा प्रशासन आतोनात प्रयत्न करतांना दिसत आहे.काल उल्हासनगर शहरातील कँम्प.नंबर दोन परीसरातील मोनिका मँरेज हाँल,व हीरा मँरेज हाँलवर लग्न सोहळ्यात शेकडो लोक सहभागी झाले होते.
3. डोंबिवलीचा वैभव हरिहरन हा CA च्या अंतिम परिक्षेत भारतात आला दुसरा
डोंबिवलीचा वैभव हरिहरन हा CA फायनल परिक्षेत अख्ख्या भारतात दुसरा आला आहे.
त्याला 800 पैकी 601 मार्क पडले असून पहिल्या क्रमांक आलेल्या 611 मार्क मिळाले आहेत.
4. चोपड्यात 'लेटर बॅाम्बच्या' सखोल चौकशीची मागणी
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचीन वाझे यांना दर महिन्याला शंभर कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिलें होते.
5. लता भगवान करे या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड
नवक्रांती सेवाभावी संस्था यांनी लता भगवान करे यांना 2020 मध्ये योग्य ते व्यासपीठ निर्माण करून दिले होते लता भगवान करे या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे.
6. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा- भारतीय जनता पार्टी
मुंबईचे CP परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षाकडून जोर धरू लागली.
7. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती अनिश्चित काळासाठी बंद
चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भुसार मालाचे खरेदी करणारे चार ते पाच व्यापारी व कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाविषाणूची मार्केट यार्डात रुग्ण संख्या वाढत असल्याने भुसार मालाचे लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत.
8. कोणी पत्र दिले म्हणून राजीनामा हे योग्य नाही!
परमवीर सिंग यांनी जे पत्र दिले आहे. त्या पत्राला कोणताही आधार नाही. त्यांनी दबावाखाली हे पत्र दिले असून कोणी पत्रं दिलं म्हणून लगेच राजीनामा घेणं हे योग्य नाही.
9. चोपडा शहर आणि तालुक्याला कोरोनाची मगर मिठी सुटता सुटेना
तालुक्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार गेल्या आठवडाभरापासून दररोज चारशेच्या जवळपास रुग्ण पॉझिटिव्ह येण्याच्या सपाटा सुरू आहे , परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रोबेशनरी प्रांत यांनी पाच दिवस शहरासह तालुका बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे.
10. इंडिया लिजंण्ड्सला विजेतेपद
आक्रमक फलंदाज युसूफ पठाण व सिक्सर किंग युवराज सिंग यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखत इंडिया लिजंण्ड्स संघाने श्रीलंका लिजंण्ड्स संघाचा 14 धावांनी पराभव करून जागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेचे विजेतेपद मिळवले.
No comments
Post a Comment