Breaking News

1/breakingnews/recent

20 मार्च Good Morning सह्याद्री

No comments

  News24सह्याद्री -कल्याण डोंबिवलीत जैविक कचरा उघड्यावर.....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. अंबानी यांच्या घराबाहेर 'सीन रिक्रिएशन
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएच्या तपासाला वेग आला आहे. 

2. कारशेडसाठीची जागा निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारचाच
राज्य सरकारने कोणती जागा कारशेडसाठी निश्चित करावी यामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करु शकत नाही. पण आपल्याकडे कुणालाही काहीही बोलण्याचं स्वातंत्र आहे,

3. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी  मोठी घोषणा
 ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी ग्रामविकास विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील ग्रामीण भागातील 3 हजार 229 चौरस फुटापर्यंतच्या (300 चौरस मीटर) भुखंडावरील बांधकामांना नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नसल्याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. 

4. आज पृथ्वीवर दिवस रात्र एकसमान 
दरवर्षी होणाऱ्या खगोलिय घटनेप्रमाणे आज दिवस आणि रात्र एक समान म्हणजे त्यांचा कालावधी एक सारखा असणार आहे. 

5. सावित्रीच्या लेकीने बापाला दिला अग्नीडाग
वंशाचा दिवा नसला तरी काय फरक पडतोय" या सामाजिक दृष्ट्या बांधिलकी असलेल्या परंपरेला छेद देऊन सावित्रीच्या लेकींनी बापाला अग्नीडाग दिल्याने, गावात व परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. 

6. नागपूर-औरंगाबाद महामार्गावर  चक्काजाम आंदोलन
लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे व सक्तीची विजबिल वसूली थांबवून कनेक्शन कापणे  तात्काळ थांबवावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर - औरंगाबाद महामार्गावर  रास्तारोको करण्यात आला. 

7. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून कोरोना नियमांबाबत जनजागृती   
औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी गंगापुर शहरात पायी फिरुन नागरीकांना तसेच दुकानदारांना कोरोना बाबतच्या नियमांचे महत्व पटवुन देत जनजागृती करुन मास्क वाटप केले.

8. उल्हासनगरच्या 10 खेळाडुंचा महापौरच्या हस्ते सन्मान
उल्हासनगर शहरात वास्तव्यास असलेल्या 10 खेळाडुंनी नँशनल स्पर्धेत नामाकंन मिळवुन उल्हासनगर चे नाव रात्री पातळीवर उंचावल्याबद्दल  काल त्या सर्व खेळाडुंचा उल्हासनगर च्या महापौर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

9. कल्याण डोंबिवलीत जैविक कचरा उघड्यावर 
कल्याण  डोंबिवली  महानगरपालिका हद्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून शून्य कचरा मोहीम राबविण्यात येते आहे. यासाठी नागरिकांना ओला आणि सुका कच-याचे वर्गीकरण करणे बंधनकारक केलं गेलय.

10. अकोल्यात मनपाच्या फिरत्या वाहन पथकाव्दारे स्वॅब संकलन
कोरोनाचा संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी अकोला महानगर पालिकाच्या फिरत्या वाहन पथकाद्वारे जिल्ह्यातील विविध ठिकाणी जावून नागरिकांचे कोविड चाचणी नमुने संकलन करण्यात येणार आहे. 






No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *