18 मार्च Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - भारतातील लशीच्या वापरापेक्षा निर्यात अधिक.....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. भारतातील लशीच्या वापरापेक्षा निर्यात अधिक
भारतात सध्या जेवढ्या प्रमाणात लशीचा वापर विविध घटकातील लोकांच्या लसीकरणासाठी करण्यात आला आहे त्यापेक्षा जास्त लस मात्रांची निर्यात भारताने इतर देशांना केली आहे.
2. ४५ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करा - मुख्यमंत्री
करोना लाट रोखण्यासाठी अतिशय कठोर पावले उचलण्याची ग्वाही देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४५ वर्षांवरील सर्वांचे सरसकट लसीकरण करण्याची मागणी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
3. वाझेंच्या सरकारमधील ‘सूत्रधारां’ची चौकशी करा!
निलंबित साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा ‘एनआयए’ने अटक केली असली तरी, त्यांचे ‘सूत्रधार’अजूनही राज्य सरकारमध्ये कार्यरत आहेत.
4. समाजमंदिरांचे माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
उल्हासनगर चे माजी स्थायी समीती सभापती राजेश वधारीया यांच्या प्रभागातील तिन समाजमंदिरांचे उद्घाटन काल माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
5. अंबरनाथ एम.आय.डी.सी.तील केमीकल कारखान्यात टाक्यांचा स्फोट
अंबरनाथ एम आय डी सी विभागातील एका केमीकल कारखान्यात काल अचानक दोन टाक्यांचा स्फोट होवुन मोठी दुर्घटना घडली झालेल्या या दुर्घटनेत जिवीत हानी झाली नसली तरी पर्यावरणाची मात्र मोठी हानी झाली आहे.
6. कल्याण-मलंगगड रोडवरील खड्ड्यांकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
कल्याण-मलंगगड या रस्त्यावर द्वारली गावाजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून येथे मोठ्या प्रमाणात धूळ सुद्धा उडत आहेत.आता याच खड्ड्यामुळे या ठिकाणी रोज संध्याकाळी तासनतास ट्रॅफिक जाम होते. तर याच रस्त्यावरील खड्ड्यामुळे आतापर्यंत 4 जण मरण पावले आहेत.
7. डोंबिवलीत कोविड लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी- नगरसेवक निलेश म्हात्रे
डोंबिवली शहरात कोरोना लसीकरण सुरु आहे. खासगी रुग्णालयातही मर्यादित स्वरुपात लसीकरण दिले जात आहे. परंतू दुसरीकडे शहरात निम्नवर्गीय नागरिकही मोठ्या प्रमाणात असून हे नागरिक आजही आरोग्य सुविधांपासून वंचित आहेत. या परिसरात कोणत्याही स्वरुपाचा सर्व्हे झालेला नाही. त्यांच्यापर्यंत कोणत्याही वैद्यकीय सेवा पोहोचलेल्या नाहीत.
8. अकोल्यातील व्यापाऱ्याला कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी.
अकोला शहरातील गीता नगर परिसरातील व्यापारी व माहेश्वरी टाईल्सचे संचालक यांना निनावी पत्र आले असून तुझी सर्व दुकाने बंद कर अन्यथा तुझ्या कुटुंबाला जीवे मारु, अशा प्रकारची धमकी त्यातून देण्यात आली आहे.
9. शिरपूरात जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद
शिरपूर शहरासह परिसरात 'जनता कर्फ्यू ला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. येथील व्यापारी व व्यवसायिकांनी आपले व्यापार, व्यवसाय बंद ठेवल्यामुळे मुख्य बाजारपेठेतही शुकशुकाट दिसून आला.
10. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या कार्यालयावर ब्लू पॅंथर संघटनेचा धडक मोर्चा
लातूर येथील शिरूर आनंतपाळ तालुक्यातील साकोळ या गावामध्ये एका मुलीवर एक तर्फी प्रेमातून छळ करण्यात आला होता .त्यामधून त्या मुलीने आत्महत्या केली.
No comments
Post a Comment