17 मार्च Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - मुख्यमंत्री ठाकरे यांची उशिरा रात्री महत्त्वाची बैठक.......पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. CM ठाकरे यांची उशिरा रात्री महत्त्वाची बैठक
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. मुंबई पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून सेवेत राहिलेले वाझे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
2. मुंबईतील सर्व शाळांबाबत उद्यापासून नवा नियम
मुंबईसह राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगरपालिकेनेही शहरातील शाळांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
3. दगडूशेठ गणपतीला अर्पण केलेला सुवर्णहार फसवणुकीच्या पैशातून
समृद्ध जीवन कंपनीनेही देशातील अनेकांना लवकरात लवकर श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवून कोट्यवधी रुपयांना लुटलं होतं.
4. पोलीस पाटलाला मारहाण करणा-या आरोपीला अटक
आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा किडंगिपार येथील पोलीस पाटील देवेंद्र भांडारकर हे गावातीलच एक भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनि पोलीस पाटलांस मारहाण केली.
5. जालन्यात रेल्वेखाली प्रेमीयुगुलाची आत्महत्या
जालन्यात प्रेमीयुगुलानी रेल्वेखाली जाऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली , जालन्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या रेल्वे रुळावर जीएसटी ऑफिसजवळ मृतदेह आढळले आहेत.
6. अकोल्यात रुग्णांसाठी बेड अपुरे
अकोल्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पाच हजाराच्यावर रुग्ण संख्या जात असून रुग्णांसाठी बेड अपुरे पडत आहे. त्यामुळे या रुग्णांच्या हालअपेष्टा होत आहे. सोमवारी दुपारी एका रुग्णाला बेड न मिळाल्याने त्याचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला.
7. अकोल्यात एसटी महामंडळाच्या धुर युक्त बसेसमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहेय.
आधीच जुन्या आणि भंगार झालेल्या बसेसमधून प्रवाशांची वाहतूक होत आहे. प्रवाशी जीव मुठीत धरून एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करीत आहेत तर खासगी बसेस असुरक्षित असल्याची ओरड करणाऱ्या महामंडळकडून मात्र प्रवाशांची असुरक्षित वाहतूक होत आहेय.
8. सावंगी येथे २४ तास विद्युत पुरवठ्याची मागणी
सावंगी येथे दहा ते बारा वर्षापासून एकच ट्रान्सफार्मर असून कमी दाबाचे आहे या ट्रान्सफार्मरवर क्षमतेपेक्षा जास्त भार असल्याने विद्युत पुरवठा तासनतास खंडित होत आहे त्यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे ग्राहकांना चोवीस तास पुरवठा द्यावा अशी मागणी होत आहे.
9. शासकीय रुग्णालयाच्या शेजारील रोडवर खड्डयांचे साम्राज्य
उल्हासनगर कँम्प.नंबर तिन परीसरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालया जवळील मुख्य रोडवर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने या ठीकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होवुन जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदरचा खड्डा त्वरित बुजविण्याची मागणी जनतेतून होत आहे.
10. राहत्या घरात गळफास घेवून तरुणाची आत्महत्या
औरंगाबाद वाळूज एमआयडीसी परिसरातील रांजणगाव येथील संदीप देवराव दीक्षित या तरुणाने रागाच्या भरात घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. त्याला प्रविण दिक्षित यांनी उपचारार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
No comments
Post a Comment