16 मार्च Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ईडीकडून जप्त....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ईडीकडून जप्त
ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलीय.. दीवाण हाउसिंग फाइनेंस लिमिटेडचे प्रमोटर्स कपिल आणि धीरज वधावान यांच्याशी संबंधीत एका मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात शिंदे यांची मुलगी प्रीति राज श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलीय.
2. नितेश राणेंविरोधात नोटीस बजावणार - वरुण सरदेसाई
राणे कुटुंबीयांना बेछूट आरोप करायची सवय लागली आहे. नितेश राणे यांनी केलेले सर्व आरोप खोटे आणि तथ्यहीन आहेत. मात्र, अशा आरोपांमुळे माझ्या राजकीय आयुष्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
3. गृहमंत्री देशमुख यांनी चुकीचे काहीही केलेले नाही - जयंत पाटील
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत वा बाहेरही बोलताना अँटिलिया प्रकरणी योग्य ती माहिती दिली. त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा सीडीआर असेल तर तो त्यांनी एटीएसकडे द्यावा, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
4. राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर
राज्य सरकारने कोरोनाबाबत नव्या नियमावली जाहीर केल्या आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता राज्य सरकारने आता कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहे.
5. 10 वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी वेबसाईटवर सराव संच
10 वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आता वेबसाईटवर सराव संच मिळणार आहे.
6. मुलीवर अमानुषपणे मारहाण करून छळ, चौकशीची मागणी
अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोपरा गावामध्ये 12 तारखेला एका मुलीवर अमानुषपणे मारहाण करून तिचा छळ करण्यात आला होता.
7. शिरपूरात जनता कर्फ्यू ने सन्नाटा
शिरपूर शहरासह परिसरात 'जनता कर्फ्यू ला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. येथील व्यापारी व व्यवसायिकांनी आपले व्यापार, व्यवसाय बंद ठेवल्यामुळे मुख्य बाजारपेठेतही शुकशुकाट दिसून आला. तथापि, अत्यावश्यक सेवा, शासकीय कार्यालये सुरु असल्याने रस्त्यावर तुरळक वाहतूक दिसून आली.
8. सुरक्षा कवच म्हणून लसीकरण करून घेण्याचे केले आवाहन
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने ११ मार्चपासून लॉक डाऊन लागू केले आहे.या लॉगडाऊनची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत आहे की नाही याची पाहणी तसेच गंगापूर तालुक्यातील कोविड केअर सेंटर आणि कोविड डेडिकेटेड हॉस्पिटलची पाहणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली.
9. हॉटेल मधून जवळपास ११ हजाराचा ऐवज चोरी
औरंगाबाद वाळूज एमआयडीसी परिसरात असलेल्या मुंबई-नागपूर महामार्गावरील असलेल्या खोजेवाडी शिवारात आसलेल्या एकलव्य हॉटेलचे शटर उचकटुन ११ हजाराचे साहित्याची लांबविणा-या अज्ञात चोरट्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
10. उल्हासनगर मध्ये बँकेला भिषण आग
उल्हासनगर कँम्प.नंबर चार पोलीस वसाहत समोर कल्याण जनता सहकारी बँकेला भिषण आग लागली .रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. यावेळी बँक बंद असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी बँकेचे कुलुप तोडून ही आग आटोक्यात आणली.
No comments
Post a Comment