Breaking News

1/breakingnews/recent

17 मार्च सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


1. CM ठाकरे यांची उशिरा रात्री महत्त्वाची बैठक
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. मुंबई पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून सेवेत राहिलेले वाझे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

2. मुंबईतील सर्व शाळांबाबत उद्यापासून नवा नियम
 मुंबईसह राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा  धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने वेढा घातल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अनलॉक प्रक्रियेअंतर्गत खुल्या केलेल्या विविध गोष्टींवर पुन्हा एकदा निर्बंध आणले जात आहेत. 

3. दगडूशेठ गणपतीला अर्पण केलेला सुवर्णहार फसवणुकीच्या पैशातून
आतापर्यंत भारतात अट्टल गुन्हेगारांनी सामान्य लोकांची फसवणूक करणाऱ्या विविध योजना आणून त्यांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे.

4. पोलीस पाटलाला मारहाण करणा-या आरोपीला अटक
आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा किडंगिपार येथील पोलीस पाटील देवेंद्र भांडारकर हे गावातीलच एक  भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनि पोलीस पाटलांस मारहाण  केली.

5. जालन्यात रेल्वेखाली प्रेमीयुगुलाची आत्महत्या
जालन्यात प्रेमीयुगुलानी रेल्वेखाली जाऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली , जालन्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या रेल्वे रुळावर जीएसटी ऑफिसजवळ मृतदेह आढळले आहेत. 

6. अकोल्यात रुग्णांसाठी बेड अपुरे
अकोल्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पाच हजाराच्यावर रुग्ण संख्या जात असून  रुग्णांसाठी बेड अपुरे पडत आहे.

7. अकोल्यात एसटी महामंडळाच्या धुर युक्त बसेसमुळे प्रदूषण 
मोठ्या प्रमाणात वाढत आहेय. आधीच जुन्या आणि भंगार झालेल्या बसेसमधून प्रवाशांची वाहतूक होत आहे. प्रवाशी जीव मुठीत धरून एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करीत आहेत तर खासगी बसेस असुरक्षित असल्याची ओरड करणाऱ्या महामंडळकडून मात्र प्रवाशांची असुरक्षित वाहतूक होत आहेय.

8. सावंगी येथे  २४ तास विद्युत पुरवठ्याची मागणी 
सावंगी येथे दहा ते बारा वर्षापासून एकच ट्रान्सफार्मर असून कमी दाबाचे आहे या ट्रान्सफार्मरवर क्षमतेपेक्षा जास्त भार असल्याने विद्युत पुरवठा तासनतास खंडित होत आहे.

9. शासकीय रुग्णालयाच्या शेजारील रोडवर खड्डयांचे साम्राज्य
उल्हासनगर कँम्प.नंबर तिन परीसरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालया जवळील मुख्य रोडवर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने या ठीकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होवुन जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदरचा खड्डा त्वरित बुजविण्याची मागणी जनतेतून होत आहे. 

10. राहत्या घरात गळफास घेवून तरुणाची आत्महत्या
औरंगाबाद वाळूज एमआयडीसी परिसरातील रांजणगाव  येथील संदीप देवराव दीक्षित या तरुणाने रागाच्या भरात  घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *