16 मार्च सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - अकोल्यात भाजी बाजारातील किराणा दुकानाला आग...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
१. अंबड येथे यशवंत सहकारी सुतगिरणीला आग
जालना जिल्ह्यातील अंबड येथे यशवंत सहकारी सुतगिरणीला आग लागलीय आज सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास ही आग लागलीय दोन तासाच्या मोठ्या कसरतीने आग आटोक्यात आणण्यात यश आलाय आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या पाचारण करण्यात आल्या होत्या.
२. अकोल्यात भाजी बाजारातील किराणा दुकानाला आग
अकोला शहरातील भाजी बाजार स्थित मार्केटमधील किराणा दुकानाला सोमवारी रात्री उशिरा आग लागली. या दुकानाला लागलेल्या आगीचे लोट पसरल्याने आसपासची तीन दुकाने जळाली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन बंबानी आग आटोक्यात आणली.
३. कोरोनाच्या प्रकोपामुळे राज्यात पुन्हा कडक निर्बंध
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात आजही 15 हजारांच्या घरात कोरोना रुग्ण सापडलेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नवी नियमावली जाहीर केलीय.
४. महागाईने गाठला २७ महिन्यांचा उच्चांक
सध्या महागाईने सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात खाण्या-पिण्याच्या वस्तूंसह वीजबील आणि इंधनाच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे समोर आले आहे.
५. निवडणुकांपूर्वीच बदलाचे वारे
पुण्याचा उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा भाजप ने राजीनामा घेतला आहे. आरपीआय ला उपमहापौर पद देण्यासाठी हा राजीनामा घेण्यात आला आहे. सरस्वती शेंडगे यांना दीड वर्षापूर्वी भाजप ने उपमहापौर पद दिलं होत. त्यापूर्वी आरपीआय चे सिद्धार्थ धेंडे हे उपमहापौर होते.
६. जळगावातही 'सांगली पॅटर्न
जळगाव महापालिकेत सत्तासमीकरणं बदलण्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. हे 27 नगरसेवक ठाण्यात दाखल झाले.
७. सोलापूर पोलिसांची कारवाई
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
८. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशेजारीच विवाहितेने घेतले पेटवून
मुलगी झाल्याच्या कारणावरून सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला. त्यांना वंशाचा दिवा हवा आहे, या कारणावरून मनस्ताप झाल्याने रागाच्या भरात विवाहितेने स्वतःला पेटवून घेतले.
९. केंद्रीय पथकांच्या पाहणीनंतर केंद्राचं महाराष्ट्राला पत्र
राज्यात करोना पुन्हा एकदा सोकावत असल्याचं दिसत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णवाढीचा वाढता आलेख कायम असून, दिवसेंदिवस तो आणखी वर सरकू लागला आहे.
१०. जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना
जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून दिवसेंदिवस नवनव्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
No comments
Post a Comment