Breaking News

1/breakingnews/recent

27 मार्च सह्याद्री बुलेटिन

No comments

  News24सह्याद्री शेतकऱ्यांच्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

1. टीएमसीची निवणूक आयोगाला मतदानाच्या प्रक्रियेत लक्ष घालण्याची विनंती
निवणुक आयोगाच्या मतदानाच्या अॅपमध्ये मतदानाच्या टक्केवारीबद्दल काही विसंगती आढळल्यानंतर तृणमूल काँग्रेसने चिंता व्यक्त केली आहे. 

2. वरिष्ठाच्या छळाला कंटाळून महिला वनाधिकाऱ्याची आत्महत्या!
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागातील हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठाच्या अतोनात छळाला कंटाळून आत्महत्या केली.

3. देशात गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा या वर्षातील सर्वाधिक रुग्णवाढ नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ६२ हजार २५८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 

4. राष्ट्रपती कोविंद यांच्या प्रकृतीत सुधारणा
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शुक्रवारी सकाळी छातीमध्ये त्रास जाणवल्याने त्यांची येथील लष्कराच्या रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. 

5. वसई-विरार शहरात ६० दिवसांत ३३५ क्षयरोग रुग्ण
वसई विरार शहरात करोनाचा कहर सुरू असतानाच दुसरीकडे  शहरात क्षय रोग रुग्णांची संख्या सातत्याने वाढू लागली आहे. मागील ६० दिवसात ३३५  क्षयरोग रुग्ण आढळून आले आहेत. 

6. दहशतवादाच्या प्रतिकारासाठी भारत-बांगलादेशाने एकत्र यावे- मोदी
भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी भारतीय उपखंडातील दहशतवादाचा प्रतिकार करण्यासाठी एकजूट दाखवण्याची आणि जागरूक राहण्याची आवश्यकता आहे.

7.शेतकऱ्यांच्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी भारत बंद पुकारला होता, त्यादरम्यान पंजाब आणि हरयाणाच्या अनेक भागांमध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र देशाच्या अन्य भागांमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

8. निवडणूक रोखेविक्रीस स्थगिती नाही
देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक होत असल्याने निवडणूक रोख्यांच्या विक्रीला स्थागिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.

9. भारतातील रुग्णसंख्या विस्फोटाने जागतिक लसपुरवठा विस्कळीत
भारतामध्ये करोना रुग्णांची संख्या पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने तेथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कोविड १९ प्रतिबंधक लस उत्पादक कंपनीला देशांतर्गत वापरासाठी अधिक लसपुरवठा करावा लागत आहे. 

10. वायगावच्या हळदीने इंग्लंडला चांगलीच भुरळ घातली असून इंग्लंडच्या एका कंपनीने तब्बल २० टन हळदीची मागणी नोंदवली. पाश्चिमात्य देशातही हळदीचे दूध पिण्याचा स्वास्थ्यविचार बळ धरीत असल्याने ब्रिटनकडून या हळदीची निवड करण्यात आली.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *