Breaking News

1/breakingnews/recent

26 मार्च सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री मेळघाट येथिल आत्महत्या प्रकरणी सुसाईड नोट सोशल मीडियावर व्हायरल...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


1. मेळघाट येथिल आत्महत्या प्रकरणी सुसाईड नोट सोशल मीडियावर व्हायरल
मेळघाट वन अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन श्रेत्रात कार्यरत परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवास स्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडल्याने वनविभागासह परिसरात एकच खळबळ उडालीये. 

2. ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार,अन्य एक जखमी
औरंगाबाद वाळूज एम आय डी सि परिसरात एफडीसी कंपनी समोर दुचाकीला पाठीमागून भरधाव ट्रकने ने जोराची धडक दिल्याने शुभम मधवसिंग गोमलाडू हा जागीच ठार  झाला तर किरण बाबासाहेब सोळस हा गंभीर जखमी झाला आहे,

3. प्रदूषित पाण्यामुळे उजनीतील मासेमारी धोक्‍यात
 राज्यात गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी उजनी जलाशय प्रसिद्ध आहे. जलाशयाच्या बॅकवॉटरवर इंदापूर, पळसदेव, भिगवण, दौंड, तसेच करमाळा, कर्जत तालुक्‍यांत मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.

4. पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर,
राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यापीठातील परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली होती. 

5. मुंबईतील मॉलला लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू
रात्री 12 वाजताच्या सुमारास भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये भीषण आग लागली आहे विशेष म्हणजे सनराईज हे कोव्हिड रुग्णालय या मॉलमध्ये आहे.

6. भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्या नातवाला मारहाण
 माजी मंत्री आणि भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्या नातवाला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरुन मुरबाडजवळच्या टोका वडे जवळ ही मारहाण करण्यात आली.

7. दोन लेकींसह बापाने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या
 पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे एका पित्याने आपल्या दोन मुलींसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

8. महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार-अजित पवार
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटके, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप आणि पोलीस दलातील बदल्यांबाबत पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून विरोधी पक्षाने उडवलेली आरोपांची राळ या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीचे मंत्री हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

9. पुण्यात पुन्हा लॉकडाऊन की आणखी कडक निर्बंध,आज निर्णय
पुण्यामध्ये लॉकडाऊन करायचा की आणखी कडक निर्बंध लावायचे याचा निर्णय आज  होणार आहे. पुण्याच्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु आहे.
 
10. राही, मनू, चिंकीला सुवर्ण पदक; विश्वचषक नेमबाजी स्पर्धा
विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सातव्या दिवशी हिंदुस्थानच्या महिलांनी 25 मीटर पिस्तोल प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. चिंकी यादव, राही सरनोबत व मनू भाकर या त्रिकुटाने अंतिम फेरीत पोलंडच्या संघाचा 17-7 गुणफरकाने पाडाव करून हिंदुस्थानला सुवर्ण पदक जिंकून दिले.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *