Breaking News

1/breakingnews/recent

20 मार्च सह्याद्री बुलेटिन

No comments

   News24सह्याद्री  देशातील गुन्हेगारीत महाराष्ट्र आठव्या स्थानी...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


1. अकोल्यात मनपाच्या फिरत्या वाहन पथकाव्दारे स्वॅब संकलन

कोरोनाचा संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी अकोला महानगर पालिकाच्या फिरत्या वाहन पथकाद्वारे जिल्ह्यातील विविध ठिकाणी जावून नागरिकांचे कोविड चाचणी नमुने संकलन करण्यात येणार आहे.

2. 'फास्टॅग' सक्तीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका

ज्या गाड्यांवर 'फास्टॅग' नाही त्या बेकायदेशीर आहेत का?, देशातील सगळे महामार्ग हे केवळ फास्टॅग लावलेल्या वाहनांसाठीच असा त्याचा अर्थ आहे का?, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला केली आहे. 


3. गुजरातमध्ये प्लॅस्टिक फॅक्ट्रीला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

गुजरातमधील प्लास्टिक कारखान्यात शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. अहमदाबादच्या वटवा येथे असलेल्या प्लॅस्टिकच्या कारखान्याला आग लागली आहे. आगीचं रुप इतकं रौद्र होतं की सर्वत्र धूर पसरला होता. 


 4. अजून किती पिढ्या आरक्षण सुरु राहणार?

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर 15 मार्चपासून नियमित सुनावणी सुरु आहे. शुक्रवारी सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं आरक्षण किती पिढ्या सुरु राहणार असा प्रश्न केला. सर्वोच्च न्यायालयानं 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवल्यास निर्माण होणाऱ्या असामनते बाबत चिंता व्यक्त केली आहे

5. देशातील गुन्हेगारीत महाराष्ट्र आठव्या स्थानी

पुरोगामी महाराष्ट्रात २०१९ मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची बाब राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या 'क्राइम इन महाराष्ट्र २०१९' या अहवालातून समोर आली आहे.

6. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश

राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून सातारा जिल्हा सुद्धा त्यास अपवाद नाही. अनेक निर्बंध घालून देखील साताऱ्यात सुद्धा कोरोना रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. 

7. भाजप खासदार स्वामींची अमित शहा यांच्यावर टीका

भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशी लढत पश्चिम बंगालमध्ये होताना दिसत आहे. भाजपने पश्चिम बंगालमध्ये सर्वप्रथमच एवढे लक्ष घातले असून, बंगालमधील प्रचार मोहिमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बारीक नजर ठेवून आहेत. 

8. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार दाखल

भाजपच्या माजी आमदार आणि नेत्या मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा गंभीर आरोप करत तक्रार करण्यात आली आहे. 

 9. मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळलेल्या ठिकाणी अजून एक मृतदेह 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर एकाच खळबळ उडून गेली होती. 

10. नव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा नवा रंग

इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाची तयाली जोर धरू लागली आहे. सर्व संघांनी आपापल्या परीने तयारीस सुरुवात केली आहे. दिल्ली कॅपिटल संघाने नुकतीच आयपीएल 2021 साठी आपली नवीन जर्सी लॉन्च केली आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *