सह्याद्री Breaking -रेखा जरे हत्याकांड बाळ बोठेच्या कोठडीत वाढ
News24सह्याद्री -
यशसवीनी महिला ब्रिगेड च्या अध्यक्षा रेखा जरी यांच्या खून प्रकरणात आरोपी असलेल्या बाळ बोटे यास न्यायालयाने पुन्हा 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे बाळ बोठे यास पोलिसांनी 13 मार्च रोजी हैदराबाद येथून अटक केली होती त्यानंतर त्यास पारनेर न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यास 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती या दरम्यान बाळ बोठे याने पहिल्या दोन दिवस काहीच माहिती दिली नव्हती मात्र आता तो माहिती देऊ लागला असून पोलिसांनी त्याच्या घरासह कार्यालयाची झडती घेतली तसेच आहे त्याचा आयफोन उघडण्यासाठी विशेष पथकाकडे देण्यात आला असून आयफोन उघडल्यानंतर आणखीन काही पुरावे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.. रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे हाती लागले असल्याने पुढील तपास करण्यासाठी पोलिसांनी बोठे यांची कस्टडी मागितली होती त्यामुळे न्यायालयाने मगबोठे यास 23 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत
No comments
Post a Comment