मोठी बातमी - नियम न पाळणार्यांना विरोधात दिले कारवाईचे संकेत
News24सह्याद्री -
कोरोना रुग्णांची संख्या पारनेर तालुक्यात दररोज वाढत चालली असुन पुढच्या एक आठवड्यात ही परीस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनासह आरोग्य विभागाने प्रयत्नशील राहावे अन्यथा गेल्या वर्षी सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होईल. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने शिथिलता जी आली आहे ती मरगळ झटकून टाका. जिल्हा पातळीवरून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहे. जिल्ह्यांमध्ये 67 टक्के लसीकरण झाले असून नियम न पाळणार्यांना विरोधात कारवाईचे संकेत दिले आहेत. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले की, जिल्ह्यात तालुकानिहाय कोरोना आढावा बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे गांभीर्याने यावर उपाययोजना गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या हातावर शिक्के व विलगीकरण कक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना तपासणी केंद्र उभारणीसाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्या गावात मोठ्या प्रमाणात रूग्ण आहेत त्या गावात उपाययोजना गरजेचे आहे. प्रत्येकाने आप आपली जबाबदारी पार पडली पाहिजे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शनिवारी दुपारी कोरोनाचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयाच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, यांच्यासह अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments
Post a Comment