मोठी बातमी - व्हीआरडीइचे चे स्तलांतर अखेर होणार नाहीच
News24सह्याद्री -
गेल्या २ महिनयांपासून व्हीआरडीई चे स्तलांतर होणार अशी चर्चा सुरु होती.दरम्यान व्हीआरडीई मध्ये कार्यरत असणारे काही कर्मचारी येथेच स्थायी झाले होते तसेच काही ची सेवानिवृत्ती होण्याची देखील वेळ जवळ अली होती आणि त्यात व्हीआरडीई चे स्तलांतर होणार या बातमीने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते मात्र त्या बाबत आज दिलासा दायक बातमी आहे....
व्हीआरडीई चे कुठल्याही प्रकारचे स्थलांतर होणार नसून तसे लेखी पत्रच डीआरडीओ यांच्याकडून मिळाली आहे,’अशी माहिती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. नवी दिल्ली येथील डीआरडीओ भवन येथे विखे यांनी डी आर डी ओ चे चेअरमन रेड्डी, संजीव जोशी आणि डी आर डी ओ च्या विविध विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांशी व्हीआरडीई संदर्भात बैठक घेतली. या बैठकीमध्ये नगरमधील व्हीआरडीई लॅबच्या स्थलांतरासंदर्भात चर्चा झाली. त्याबाबत माहिती देताना खासदार विखे म्हणाले, ‘आज या प्रश्नी सविस्तर बैठक झाली आहे. व्हीआरडीई मध्ये कार्यरत असणारे कर्मचारी, अरणगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यासर्वांना सांगण्यास मला आता आनंद होत आहे की, व्हीआरडीईचे कोणत्याही प्रकारचे स्थलांतर होणार नाही. तसे मला लेखी पत्र मिळाले आहे. या लेखी पत्रात व्हीआरडीई मध्ये तुर्तास कुठलेही बदल होणार नसून त्याचे स्थलांतर होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. उलट व्हीआरडीई मध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू होणार आहेत. तसेच व्हीआरडीईचे विस्तारीकरण होणार आहे, अशी मला माहिती देण्यात आले आहे. व्हीआरडीई विस्तारीकरणाबाबतचा निर्णय घेतला जात असल्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आभार मानतो,’ असेही विखे यांनी स्पष्ट केले.. व्हीआरडीई स्थलांतर होत असल्याच्या बातमी मुळे मधल्या काळात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते तसेच आमदार संग्राम जगताप आमदार निलेश लंके याना भेटून
व्हीआरडीई स्थलांतर करू देऊ नका या बाबतचे निवेदन देण्यात आले होते या बाबत खा शरद पवार यांच्याशी नगर जिल्ह्यातील; आमदारांनी चर्चा केली होती अखेर
व्हीआरडीई स्थलांतर होणार नाही या विषयवारखा सुजय विखे यांनी पडदा टाकलं आहे
No comments
Post a Comment