Breaking News

1/breakingnews/recent

25 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

  News24सह्याद्री - महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वाचवले तडफडणाऱ्या चिमण्यांचे प्राण...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES


1. श्रीगोंदा तालुक्यात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह गारांचा  पाऊस
बुधवारी रात्री सात वाजता श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला आहे तर तालुक्यातील कोळगाव कोरेगाव या भागात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडला आहे.

2. कानिफनाथांचे  समाधी मंदिर तीन दिवस बंद
कोरोना च्या पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील मढी गाव आणि कानिफनाथांचे  समाधी मंदिर तीन दिवस बंद राहणार आहे बळी येथे चैतन्य कानिफनाथ यांची यात्रा होळीपासून गुढी पाडव्यापर्यंत चालते.

3. नगर तालुक्यात कोरोनाचा कहर
बरोबर एक वर्षांपूर्वी २५ मार्चला देशभरात कोरोनामुळे संचारबंदी घोषित करण्यात आली होती. ती काळाच्या ओघात टप्प्याटप्याने उठवण्यात आली. गेल्या वर्षभरात नगर तालुक्यातील ४ हजार २४ लोकांना कोरोनाची बाधा झाली. त्यात १२२ लोकांचा मृत्यूही झाला.

4. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वाचवले तडफडणाऱ्या चिमण्यांचे प्राण
मार्च महिना असल्याने महावितरण कंपनीने अभियंत्यामार्फत थकबाकी आढावा मोहीम हाती घेतली आहे. याचा आढावा घेता घेता पाण्यावाचून तडफडणाऱ्या चिमण्या महावितरणचे अधिकारी नीलेश नागरे यांना दिसल्या. 

5. स्वाभीमानीच्या आंदोलनानंतर रोहित्रांची वीज जोडणी पूर्ववत
कोणतीही पूर्व सुचना न देता महावितरणने टाकळीमिया आरडगाव, मोरवाडी भागातील २६ रोहित्र बंद केल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन तोडफोडीचा इशारा देताच नरमलेल्या महावितरण अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन जोडण्याचे आदेश दिले.

6. मुलगा झाल्याच्या आनंदात अमोल लांडगे यांनी ग्रामस्थांना केले २०० मास्कचे वाटप
गावातून कोरोना रोखण्याबाबत ग्रामस्थांकडून मास्कचा वापर करण्यात यावा म्हणून येथील वॉटर संस्थेचे विकास अधिकारी अमोल ज्ञानेश्वर लांडगे यांनी सामाजिक बांधिलकी जपली. 

7. श्रीरामपुरात दिवसात ७९ कोरोना बाधितांची भर
श्रीरामपूर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ पाहत आहे, अशी चिंता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी श्रीरामपुरात कोरोना आढावा बैठकीत मंगळवारी व्यक्त केली होती.

8. जिल्ह्यासाठी वाढीव ५००  पोलिसांचा प्रस्ताव
क्षेत्रफळाने राज्यात सर्वाधिक मोठा आणि गुन्हेगारीच्या दृष्टीने संवेदनशील अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात  500 वाढीव पोलिस द्यावेत असा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शासनाकडे पाठवला आहे

9. जामखेड तालुक्यात कोरोनाचा कहर
मागील वर्षी जामखेड तालुक्यात कोरणान धुमाकूळ घातला होता त्यामुळे आता काळजी घेणे आवश्यक होत पण  काळजी न घेतल्याने तालुक्यातील दिघोळ येथे आठ दिवसात कोरोनान  तब्बल सहा जणांचा बळी घेतला आहे 

10. नगरपालिकेने केली थकबाकीदाराची दुकाने सील
कोपरगांव नगरपरिषदेच्या विविध व्यापारी संकुलातील गाळे धारकांकडे थकीत असलेल्या गाळा भाडे व इतर कर वसुलीसाठी कोपरगांव नगरपरिषदेने दिनांक २३ मार्च २०२१ रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांच्यासह मार्केट विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत थकबाकी दाराची दुकाने सील केली असून या कारवाई मुळे व्यापारी वर्गाचे धाबे दणाणले आहे.
 
 




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *