शहराची खबरबात - टू प्लस आरोपींना पो.अधीक्षक मनोज पाटील यांची तंबी
News24सह्याद्री - टू प्लस आरोपींना पो.अधीक्षक मनोज पाटील यांची तंबी... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
१. खा. सुजय विखे प्रशासनावर नाराज
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या तसेच केंद्रीय राज्यमंत्री पद भूषवलेल्या माजी खासदार दिलीप गांधी यांचं 17 मार्चला दिल्लीमध्ये निधन झालंय.दिलीप गांधी यांनी जिल्हा आणि देश पातळीवर दिलेल सामाजिक आणि राजकीय योगदान सर्वश्रुत आहे.
२. टू प्लस आरोपींना पो.अधीक्षक मनोज पाटील यांची तंबी
भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये आज टू प्लस मधील सर्व आरोपींची प्रत्यक्ष पाहणी करून पुन्हा गुन्हे केल्यास कारवाई केली जाईल, अशी तंबी सर्व उपस्थित आरोपींना जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
३. रिक्षा संघटनेच्या वतीने पाणपोईचा श्रीगणेशा
नगर शहरातील माळीवाडा बस स्थानकासमोरील जिल्हा परिषदेच्या गेटवर अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने रिक्षा थांबा आणि पाणपोईचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप आणि संघटनेचे अध्यक्ष तसेच मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांच्या हस्ते करण्यात आले .
४. मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना भिंगार कॅम्प पोलिसांकडून अटक
भिंगारच्या आठवडे बाजारात चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीमधील दोन आरोपी मोबाईलची चोरी करून पळून जाताना त्यांचा पाठलाग करून त्यांच्याकडून 55 हजार रुपयांचे एकूण सहा मोबाईल हस्तगत करण्यात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याला यशाला आहे रायप्पा मधूर , रमेश प्रसाद गोडेट्टी अशी या आरोपींची नावे आहेत.
५. रिक्षाचालक व दुकानदार यांच्या भांडणात हॉकर्सना टार्गेट
नगर शहरातील घास गल्लीत अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या हॉकर्स आणि मनपा अतिक्रमण विरोधी विभागाच्यावतीने कारवाई होत असून ही कारवाई थांबवण्याची मागणी हॉकर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
No comments
Post a Comment