20 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - दहा लाखाच्या बिबट्याच्या कातडीसह दोघांना अटक...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. ऊस तोडणी कामगारांच्या कुटुंबाला मदतीचा हात
कोपरगाव शहरातील स्टेशन रोड बागुल वस्ती याठिकाणी राहत असलेल्या ऊस तोडणी कामगार इब्राहिम पठाण यांच्या घराला महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारच्या सुमारास आग लागल्याने सर्व संसारोपयोगी वस्तू जाळून खाक झाल्या होत्या.
2. दहा लाखाच्या बिबट्याच्या कातडीसह दोघांना अटक
शिक्रापूर येथून बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १० लाख २५ हजार किंमतीची बिबट्याची कातडी व दुचाकी जप्त केली आहे.
3. साईबाबा संस्थानची प्रसाद लाडू विक्री सुरु
करोना काळात बंद करण्यात आलेली साईबाबा संस्थानची प्रसाद लाडू विक्री आजपासून पुन्हा सुरू होणार आहे. गेट नंबर ४ व साईबाबा कॉम्प्लेक्स मध्ये काउंटर लावणार आहे
4. वाकडी शिवारात दोघांना पोलिसांनी पकडले
तालुका हद्दीत वाकडी शिवारात दरोड्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या टोळीतील दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. परंतु अंधाराचा फायदा घेत चौघेजण पसार होण्यात यशस्वी झाले.
5. तर दुकाने मंगल कार्यालय महिनाभरासाठी सील
दुकानदार आणि ग्राहक ज्या दुकानांमध्ये मास्कचा वापर करताना आढळून येणार नाही अशी दुकाने महिनाभरासाठी सील करण्यात येणार आहे ज्या मंगल कार्यालयांमध्ये लग्न अथवा इतर समारंभासाठी 50 पेक्षा अधिक लोक असतील अशी मंगल कार्यालय देखील करण्यात येणार आहे.
6. दुकानदारांनी नियमांचा काटेकोरपणे पालन न केल्यास कारवाई चे आदेश
दिवसांदिवस कोपरगाव शहरासह तालुक्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याने परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे कोपरगाव शहरात आले असता त्यांनी एसएसजीएम महाविद्यालय येथील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली आहे.
7. शिर्डीत दोन ठिकाणी प्रतिबंधात्मक घोषित
विठ्ठल वाडी व श्रीकृष्ण नगर भागात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून ही दोन ठिकाणे प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आली आहे.
8. जिल्ह्यातील 200 रस्ते, पुलांच्या कामाला मंजुरी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लाॅकडाऊन मुळे गेल्या वर्षभरात रखडलेल्या जिल्ह्यातील २०० विकास कामांसाठी निवीदा प्रक्रिया राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
9. व्यापाऱ्याच्या हत्या प्रकरणातील आरोपींना 22 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
जिल्ह्यातील बेलापूर येथील बहुचर्चित व्यापाऱ्याचे हत्याकांडाने नगर जिल्हा हादरून गेला होता. याच हत्याकांडातील अटकेत असलेल्या पाच आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे
10. आठवडी बाजाराचे योग्य नियोजन करणे गरजेचे
जिल्ह्यावर कोरोनाचे संकट पुन्हा घोगावु लागल्याने प्रशासन पुन्हा एकदा सतर्क झाले आहे. यातच लग्नसोहळे, कार्यक्रम, आठवडे बाजार या ठिकाणी होणारी गर्दी कोरोना प्रादुर्भावास कारणीभूत ठरत असल्याची दिसून येत आहे
No comments
Post a Comment