Breaking News

1/breakingnews/recent

19 मार्च Good Morning सह्याद्री

No comments

 News24सह्याद्री - बायोवेस्ट कचऱ्याने बजाजनगर हैराण.....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. तालुक्यातील आसनखेडा वनक्षेत्रात आगीचे तांडव
पाचोरा तालुक्यातील आसनखेडा जवळील वनविभागाला दि. १८ रोजी आग लागून १ हजार ५०० हेक्टर पैकी सुमारे ६५ टक्के हेक्टर क्षेत्र बांधीत झाले आहे. आगी बाबत प्राथमिक माहिती नुसार आगीच्या रौद्ररुप धारण केल्याने जंगलातील संपुर्ण टेकड्या जळून खाक झालेल्या आहेत.

2. बजाजनगरात कोचिंग क्लासेस चालविणाºया दोघाविरुध्द गुन्हा दाखल आसला तरी काही शिकवणी सुरूच
औरंगाबाद वाळूज एमआयडीसी परिसरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाकडे दुर्लक्ष करीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तमा न बाळगता शिकवणी वर्ग चालविणाºया बजाजनगरातील दोन कोचिंग क्लासेस विरुध्द  गुरुवारी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत गुन्हा दाखल केला.

३. कल्याण डी मार्ट पाच दिवसांसाठी सील,सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह !
कल्याण डोंबिवकली महानगर पालिका क्षेत्रात काल ५९३ आणि आज ५६५ कोरोनाचे रुग्ण आढळून आले. याच  पार्श्वभूमीवर महापालिकेकडून व्यापारी आणि दुकानदारांची अँटीजेन टेस्ट सुरु करण्यात आली आहे.

४. कल्याण-शीळ काँक्रीट रस्त्याच्या गुणवतेचा इशू !
आज एमएसआरडीसी अधिकारी, ठाणे आणि केडीएमसीचे अधिकारी, ट्रॅफिक पोलीस आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण-शीळ रस्त्याच्या कामाची पाहणी केली.

५. अंबरनाथमध्ये पिस्तुल बाळगणारा युवक अटकेत..एक जिवंत काडतुस जप्त..
अंबरनाथच्या जय मल्हार हॉटेल समोर एक तरुण रात्रीच्या अंधारात संशयास्पद उभा असल्याची गुप्त माहिती शिवाजी नगर पोलिसांना मिळाली होती.मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सापळा रचून त्या तरुणाला ताब्यात घेतले.

6. गोरगावले रस्त्यावर खड्यात बुडून भाऊ - बहिणीचा मृत्यू
चोपडा गोरगावले रस्त्यावर गंगाई नगर जवळ रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराने करून ठेवलेल्या पाण्याचा खड्यात शहरातील मल्हारपूरा - खाईवाडा भागातील रहिवासी असलेल्या दोन चिमुकल्याचा खेळत असताना बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि 18 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

7. बायोवेस्ट कचऱ्याने बजाजनगर हैराण

औरंगाबाद वाळूज एमआयडीसी परिसरात असलेल्या बजाजनगर मोहटादेवी समोर आसलेल्या स्मशानभूमी गेट समोर दवाखान्यातून निघणार्या बायोवेस्ट मेडिकल जैविक कचर्याची योग्य स्थळी विल्हेवाट न लावता तो उघड्यावर फेकला जाण्याचा प्रकार बजाजनगर येथे पुन्हा उघडकीस आला. 

8. जळगावात भाजपच्या सत्तेला सुरुंग
जळगाव महापालिकेत भाजपच्या एकहाती सत्तेला शिवसेनेने सुरूंग लावला असून सांगलीनंतर दुसरी महापालिका भाजपला गमवावी लागली आहे. 

9. रुग्णसेवेला हक्काची जागा
पालघर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाला अखेर शासकीय जमीन गवसली आहे. 

10. फायनान्स कंपनीला लाखोंचा गंडा घालणाऱ्यास अटक
औरंगाबाद – गृहकर्जाच्या नावाखाली फायनान्स कंपनीला लाखोंचा गंडा घालणाऱ्यास अटक
बनावट मुल्याकंन अहवाल सादर करत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *