Breaking News

1/breakingnews/recent

27 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

    News24सह्याद्री - महावितरणाचा शॉक! १७ पाणी पुरवठा योजना बंद...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES


1. जामखेडचा शनिवारचा आठवडा बाजार १५ एप्रिलपर्यंत बंद
कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

2. आगामी गळीत हंगामात इथेनॉल उत्पादनाची चाचणी
आगामी गळीत हंगामात नियोजित इथेनॉल उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उत्पादनाची चाचणी घेतली जाईल, असा विश्वास वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांनी व्यक्त केला.

3. महावितरणचा शॉक! १७ पाणी पुरवठा योजना बंद
ऐन उन्हाळ्यात महावितरणचा शॉक,१५ ग्रामपंचायतीच्या १७ पाणी पुरवठा योजना बंद झाल्यात मग आमदार करतात काय ? असा संतप्त सवाल भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.

4. श्रीरामपुरात नव्याने ५५ रुग्णांची भर
श्रीरामपुर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ पाहत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असून शुक्रवारी ५५ रुग्णांची भर पडली. श्रीरामपूर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ लागला.

5. संगमनेरात बाधित संख्या आठ हजारांवर; पोलिस रस्त्यावर
संगमनेरात दोन दिवसात १८५ रुग्णांची भर पडल्याने बाधित संख्या ८१७६ झाली. शुक्रवारी ४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ७५१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. ५९८ बाधितांवर उपचार सुरू असून ६३ जणांचा कोरोनाने बळी गेला. 

6. कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कर्जत शहरातील ६ आणि मिरजगावच्या सहा दुकानांवर कर्जत तालुका प्रशासनाने सात दिवस दुकाने बंद ठेवण्याची कारवाई केली. 

7. महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर शहर व तालुक्यातील प्रशासकीय व आरोग्य अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन कोरोना प्रादुर्भाव, लसीकरण व विविध उपाययोजनांचा आढावा घेतला

8. जिल्हा परिषदेचे ४६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर
जिल्हा परिषदेने पुढील आर्थिक वर्षासाठी एकूण ४६ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले असून त्याला शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत मान्यता देण्यात आली. 

9. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेले जामखेड तालुक्यातील खर्डा व परिसराचे ग्रामदैवत असलेली कानिफनाथ यात्रा रद्द करण्यात आली. हा निर्णय पोलीस चौकी येथे सरपंच आसाराम गोपाळघरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शांतता व यात्रा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

10. संगमनेर येथे केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसचे धरणे
केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेले काळे कायदे फक्त अंबानी, अदानीच्या फायद्याचे आहे. कृषी व्यवसाय व व्यापार उद्योजकांच्या खिशात घातला जात आहे.
 



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *