Breaking News

1/breakingnews/recent

27 मार्च सह्याद्री वेगवान आढावा

No comments

  News24सह्याद्री - पुण्यातील सर्व यंत्रणांना पालकमंत्री अजित पवार यांचा अलर्ट..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. बांगला देशाच्या स्वातंत्र्यासाठी माझाही सत्याग्रह : मोदी
बांगला देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात मी सहभागी झालो होतो. माझ्या जीवनातील हे पहिलेच आंदोलन होते. त्या वेळी मी 20-22 वर्षाचा असेल. त्या वेळी माझ्यासह माझ्या अनेक सहकार्‍यांनी बांगला देशाच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता.

2. नासाचे ड्रोन मंगळावर उडणार
अमेरिकेची अंतराळ संस्था नासा येत्या एप्रिल महिन्यात मंगळावर ड्रोन उडवणार आहे. पर सिव्हिरन्स रोव्हरच्या मदतीने हा ड्रोन मंगळावर आधीच पाठवण्यात आलेला आहे. 

3. शांतीसेनेसाठी भारतातर्फे करोना लसीचे दोन 2 लाख डोस
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी ही फेब्रुवारी महिन्यात ही घोषणा केली होती. दुसऱ्याच्या कल्याणासाठी कार्यरत राहा असा गीतेचा संदेश आहे त्यानुसारच भारताने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले होते.

4. शंभर जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करा
छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती यंदा 31 मार्च 2021 रोजी साजरी होणार आहे. हा उत्सव शिवप्रेमी शिवनेरी किल्ला तसेच अन्य गडकिल्ल्यांवर जाऊन साजरी करतात. 

5. कारागृहात सात कर्मचारी आणि दोघा गुन्हेगारांकडून लैंगिक अत्याचार
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार संबंधित तृतीय पंथीयाने केली आहे. कारागृहातील सात कर्मचारी आणि दोन अट्टल गुन्हेगारांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप त्याने केला आहे.

6. पुण्यात 'टीव्हीपेक्षा तेज' सट्टेबाजी करणाऱ्या 33 बुकींना अटक
भारत विरुद्ध इंग्लड क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या 33 बुकींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर गहुंजे क्रिकेट मैदानाच्या  जवळील गोदरेज प्रॉपर्टी, घोरडेश्वर डोंगर आणि पुण्यातील पंचतारांकीत हॉटेलमधून सट्टेबाज बुकींना पोलिसांनी अटक केली आहे 

7. पुण्यातील सर्व यंत्रणांना पालकमंत्री अजित पवार यांचा अलर्ट
कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा. शासकीय आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासण्या वाढवा. 

8. पुण्यात आग, ५०० दुकानं खाक
पुण्याच्या कँप परिसरातील फॅशन स्ट्रीटला काल रात्री ११च्या सुमारास आग लागली. थोड्याच वेळात आगीचा मोठा भडका उडाला. अग्नीशमन दलाच्या १६ बंबगाड्या आणि २ पाण्याचे टँकर यांच्या मदतीने पहाटे आगीवर १ वाजून ६ मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. 

9. देशात सक्षम विरोधी पक्ष नसेल तर भाजपला कसे रोखणार
देशात एक सक्षम विरोधी पक्ष निर्माण व्हायला हवा. देशात उत्तम विरोधी पक्ष तयार झाला नाही तर भाजपला कसे रोखणार, असा सवाल शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केला.

10. 'मुंबई इंडियन्स'मध्ये येताच अर्जुन तेंडुलकरची जोरदार सुरूवात !
 यंदाची आयपीएल स्पर्धा मुंबई इंडीयन्ससाठी खास असणार आहे. कारण भारतीय संघाचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईच्या संघाकडून खेळणार आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *