PPE कीट घालून परीक्षा, MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी 'सूचनावली',कोरोनाबाधित उमेदवारांनाही परीक्षा देता येणार
मुंबई -
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएसी)च्या मुलासाठी सूचनावली तयार केली आहे. पूर्वपरीक्षेची नवीन तारीख जाहीर केली असून त्यानुसार ही परीक्षा येत्या २१ मार्चला परीक्षा होणार आहे. याशिवाय, २७ मार्च आणि ११ एप्रिलला होणाऱ्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर एमपीएससीने हा निर्णय घेतला आहे. त्यानंतर, आता एमपीएससीकडून परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना आणि नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही नियमावली देण्यात आली आहे. कोरोनाबाधित उमेदवारांनाही परीक्षा देता येणार आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीने येत्या रविवारी (१४ मार्च) होणारी राज्य सेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय बुधवारी रात्री उशिरा जाहीर केला आहे. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. त्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना परीक्षेची नवीन तारीख २४ तासांत जाहीर केली जाईल,असे सांगून आंदोलक विद्यार्थ्यांनी आश्वस्त केले होते. त्यानुसार आयोगाने शुक्रवारी परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या. आता, आयोगाने परीक्षेसंदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पत्र जाहीर केले आहे. त्यानुसार, ज्या उमेदवारास कोविड १९ ची लक्षणे आहे. त्यांची बसायची व्यवस्था स्वतंत्र केली जाईल आणि त्यांना पीपीई किटही दिले जाणार आहे.
1. विद्यार्थ्यांना तीन पदरी कापडाचा मास्क परिधान करणे बंधनकारक आहे.
2. परीक्षा केंद्रात उमेदवारांना कोरोना कीट देण्यात येईल, त्याचा दोन्ही सत्रासाठी उपयोग करावा.
3. परीक्षेवेळी सातत्याने हात सॅनिटाईज करणे आवश्यक आहे.
4. परीक्षा संपल्यानंतर केंद्राबाहेर जाताना शारीरिक अंतर राखणे, सामाजिक अंतर ठेवणे गरजेचं आहे.
5. कोविड 19 ची लक्षणे असलेल्या उमेदवारांची स्वतंत्र खोलीत परीक्षा घेण्यात येईल, तसेच अशा उमेदवारांना पीपीई कीटसह आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाईल.
6. परीक्षांचे वेळापत्रक
२१ मार्च
राज्य सेवा पूर्वपरीक्षा
२७ मार्च
अभियांत्रिकी परीक्षा
११ एप्रिल
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा
No comments
Post a Comment