NIA ने केला मोठा खुलासा! CCTV मध्ये दिसणारी व्यक्ती पायजमा कुर्ता घातलेली व्यक्ती सचिन वाझेच
मुंबई -
गेल्या अनेक दिवसा पासून अँटिलियाच्या बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या कुणी? या प्रश्नाचे उत्तर अद्याप सापडलेले नाही. मात्र, अँटिलियाबाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच असल्याचे NIA ने आता स्पष्ट केले आहे. एएनआयने यासंदर्भात माहिती दिली असून सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने PPE किट घातलेले नसून साधा कुर्ता-पायजमा घातला असल्याचे देखील एनआयएने सांगितले आहे. या प्रकरणी अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणाचा तपास एनआयए करत असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. मुंबई सीआययूचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा या प्रकरणात असलेला कथित सहभाग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यानच्या काळात अँटिलियाबाहेरचे एक सीसीटीव्ही फूटेज एनआयएने तपासासाठी घेतल्यानंतर ते सोशल मीडियावर देखील व्हायर होऊ लागले. सीसीटीव्ही फूटेजमध्ये एक व्यक्ती PPE किट घालून अँटिलियाच्या बाहेरून जात असल्याचं दिसत आहे. मात्र, आता हे पीपीई किट नसून तो कुर्ता-पायजमा असल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे. तसेच, ते सचिन वाझेच असून त्यांनी आपला चेहरा ओळखू येऊ नये म्हणून मोठ्या हातरुमालाने झाकून घेतला आहे, असं देखील एनआयएने म्हटले आहे. आपली हालचाल कुणाच्या लक्षात येऊ नये, म्हणून सचिन वाझेंनी कुर्ता-पायजमा घातल्याचे देखील एनआयएने सांगितले आहे. दरम्यान, एनआयएने सचिन वाझे यांच्या कार्यालयातून लॅपटॉप जप्त केला होता. मात्र, या लॅपटॉपमधील सर्व डाटा आधीच डिलीट केल्याचं एनआयएच्या निष्पन्न झालं आहे. तसेच, सचिन वाझे यांच्याकडे चौकशीदरम्यान त्यांच्या मोबाईल फोनची मागणी केली असता तो हरवल्याचं त्यांनी सांगितलं. पण तो हरवला नसून त्यांनी कुठेतरी फेकून दिला आहे, असं देखील एनआयएचे म्हणणे आहे.
No comments
Post a Comment