‘एनआयए’ने तपास पूर्ण करुन बोला, विनाकारण रोज वेगवेगळ्या बातम्या पसरवू नये: जयंत पाटील
मुंबई -
जयंत पाटील म्हणाले की अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि सचिन वाझे यांच्या चौकशीबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेने निष्कर्षाप्रत पोहोचल्या नंतरच बोलावे. दररोज विनाकारण वेगवेगळ्या बातम्या पसरवू नयेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. या सगळ्यामुळे तपास प्रक्रियेविषयी काहीच माहिती नसलेल्या समाजातील लोकांपर्यंत चुकीचा संदेश जातो. त्यामुळे NIA ने प्रथम संपूर्ण तपास पूर्ण करावा. या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागला की अधिकृतपणे सर्वांसमोर येऊन बोलावे, असे जयंत पाटील यांनी म्हटले. केंद्रीय यंत्रणांनी तपास जरुर करावा. मात्र, वर्तमानपत्रांमध्ये अमक्याने हे केले, ते केले, अशा बातम्या सोडू नयेत. या सगळ्या जेव्हा पुराव्याआधारे ‘एनआयए’ने निष्कर्ष जाहीर केल्यानंतर राज्य सरकार संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई करायला तयार आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि सचिन वाझे यांच्या चौकशीबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेने निष्कर्षाप्रत पोहोचल्यानंतरच बोलावे. दररोज विनाकारण वेगवेगळ्या बातम्या पसरवू नयेत. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले. या सगळ्यामुळे तपास प्रक्रियेविषयी काहीच माहिती नसलेल्या समाजातील लोकांपर्यंत चुकीचा संदेश जातो. त्यामुळे NIA ने प्रथम संपूर्ण तपास पूर्ण करावा. या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागला की अधिकृतपणे सर्वांसमोर येऊन बोलावे, असे जयंत पाटील यांनी म्हटले. केंद्रीय यंत्रणांनी तपास जरुर करावा. मात्र, वर्तमानपत्रांमध्ये अमक्याने हे केले, ते केले. अशा बातम्या सोडू नयेत. या सगळ्या जेव्हा पुराव्याआधारे ‘एनआयए’ने निष्कर्ष जाहीर केल्यानंतर राज्य सरकार संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई करायला तयार आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
No comments
Post a Comment