Breaking News

1/breakingnews/recent

वजनावर नियंत्रण, पोटाच्या त्रासांवरही उपयुक्त, गाजर खाण्याचे महत्वाचे फायदे

No comments



मुंबई -

गाजर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गाजरात व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई, जी असतात. त्यामुळे गाजर खाणे शरीरासाठी फायद्याचे आहे. यामुळे अनेक आजारांवर मात करता येते. गाजर खाल्ल्याने हाडे निरोगी राहण्यापासून ते डोळ्यांचा कमकुवतपणा देखील दूर होतो. गाजरात 95 टक्के पाण्याचे प्रमाण असते. ज्यामुळे गाजर खाण्यामुळे तुम्ही हायड्रेट राहता. चला तर मग जाणून घेऊयात गाजर खाण्याचे इतर कोणते फायदे आपल्या शरीराला होतात. 

१. निरोगी राहण्यासाठी आहाराबाबत काळजी घेऊन आणि वजन नियंत्रित ठेवून टाईप 2 मधुमेह कमी करता येऊ शकतो. काही संशोधनानुसार आहारात व्हिटॅमिन ए चा समावेश करून तुम्ही टाईप 2 मधुमेहावर उपचार करू शकता. गाजरात व्हिटॅमिन ए मुबलक असल्यामुळे मधुमेहींसाठी गाजर खाणं नेहमीच फायद्याचं ठरू शकतं.

२. एका गाजरामध्ये अंदाजे 95 % पाणी असतं. शिवाय एका मध्यम आकाराच्या गाजरात जवळजवळ 25 कॅलरिज असतात. ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तुमच्या आहारात गाजर असणं अतिशय गरजेचं आहे. गाजरातील फायबर्समुळे तुमचं पोट बराच काळ भरल्यासारखं वाटतं.

३. गाजरात फायबर्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी असे अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या रक्तदाब चांगला राहतो. आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज गाजराचा रस पिणे चांगले असते.

४. पोटाच्या आणि आतड्याच्या तक्रारीवर गाजर उपयुक्त ठरतं. पोटात जंत झाले असतील, तर रोज सकाळी एक कप गाजराचा रस घेतल्यास जंत निघून जातील.

५. गाजरात कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी, बी इत्यादी शरीराला आवश्यक असणारे घटक असतात. त्यामुळे हृदयरोग असणाऱ्यांच्या आहारात गाजर असायलाच हवे. तसेच ज्यांना नाही त्यांनीही नियमित गाजर खाल्ल्यास हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते.

६. गाजरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. यामुळे गाजर चावून चावून खाल्ल्याने आतड्यांची स्वच्छता होते. यामुळे बध्दकोष्ठ आणि गॅस सारख्या समस्यापासुन आराम मिळतो. पोटाच्या आणि आतड्याच्या तक्रारीवर गाजर उपयुक्त ठरतं.

७. गाजर दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठीही परिणामकारक ठरतं. जेवणानंतर गाजर खाल्ल्याने दात स्वच्छ होतात.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *