Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - स्वच्छ सर्वेक्षणासाठी पथके शहरात दाखल

No comments

     News24सह्याद्री स्वच्छ सर्वेक्षणासाठी पथके शहरात दाखल..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. बुरूडगाव ग्रामपंचायतीचा नगर मनपाला इशारा
शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असणाऱया बुरुडगाव येथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. महापालिकेच्या कचरा डेपोला एनओसी देताना ग्रामपंचायतीने पिण्याचे पाणी देण्याची अट घातली होती. तथापि महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी बुरुडगावला जाणूनबुजून पाण्यापासून वंचित ठेवत आहेत. 

2. स्वच्छ सर्वेक्षणासाठी पथके शहरात दाखल
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत तपासणी साठी अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शहरात केंद्राची पथके दाखल झाले आहेत शहरातील सर्व प्रभागांमध्ये जाऊन तपासणी केली जात आहे.

3. नगरच्या पोलिसांनी दिले प्रशंसापत्र
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी व दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे याला हैदराबाद येथे जेरबंद करण्यात मोलाची कामगिरी बजावणार्‍या हैदराबाद पोलिसांचा प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला. 

4. बोठे होता नगरच्या रेल्वे स्टेशनवर
 यशस्वीनि महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा  जरे यांच्या हत्याकांडातील पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सूत्रधार बाळ बोठेच्या   पोलिस कोठडीत 25 मार्च पर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायाधीश उमा बोऱ्हाडे यांनी  मंगळवारी दिले दरम्यान  3 ते 10 डिसेंबर या कालावधीत आपण नगरच्या रेल्वे स्टेशनवरच राहत असल्याची माहिती चौकशीत  बोठे याने दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले

५. नगरकरांना तासभर , ग्रामपंचायतींना मात्र दिवसभर पाणी
पाणी पुरवण्याची बोंब  सुरू असताना नगरकरांना जेमतेम अर्धा ते एक तास पाणी आणि तेही दिवसआड  मिळत असताना शहराजवळील ग्रामपंचायतीना  मात्र महापालिकेच्या वाहिनीवरून दररोज चोवीस तास पाणीपुरवठा सुरू असल्याचा प्रकार समोर आला. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *