Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - नागवडे कारखान्याच्या बैठकीत राजकारण

No comments

  News24सह्याद्री - नागवडे कारखान्याच्या बैठकीत राजकारण....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या




TOP HEADLINES


1. कुकडी इथेनॉल प्रकल्प उभारणीची प्रक्रिया पूर्ण
कुकडी सहकारी साखर कारखान्याने केएलपीडीचा इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता केली आहे. मे अखेरीस या प्रकल्पाच्या कामास सुरुवात होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी दिली. 

२. शेवगावच्या १३ गावांना मिळणार १९ लाखांची मदत
शेवगाव तालुक्यात गतवर्षी अवकाळीसह गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच मदत वर्ग केली जाणार आहे. तालुक्यातील १३ गावांतील शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ५०० रुपयेप्रमाणे मदत मिळणार आहे. 

३. मिरीत कोरोना नियम न पाळणाऱ्या २७ जणांवर कारवाई
पंचायत समितीच्या पथकाने पाथर्डी तालुक्यातील मिरी  येथे कोरोनाबाबतचे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी २७ जणांकडून दंड वसूल करून कोरोना प्रतिबंधात्मक नियमाबाबत जनजागृती केली. 

४. नागवडे कारखान्याच्या बैठकीत राजकारण
नागवडे कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्यात आलीय.  या सभेला कारखाना प्रशासनाने आजी-माजी सभासद व  आमदारांना निमंत्रण देणे गरजेचे असताना कारखान्याने  मर्जीतील ठराविक लोकांनाच सभेची ऑनलाइन लिंक पाठवत निमंत्रण देत झालेल्या बैठकीत घाणेरडे राजकारण केल्याच पाहायला मिळालय. 

५.  श्रीरामपूरमध्ये कोरोनाच वाढता संसर्ग  (नगरपालिका )
सध्या कोरोनाव्हायरस मध्ये बदल झाला असून त्याच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असून कुटुंबाची कुटुंब बाधित होत असल्याचं समोर येत असून त्यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे असे आवाहन श्रीरामपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन शिंदे यांनी केलं आहे. 

६. दुकानदाराला जातीवाचक शिवीगाळ
दुकानाच्या जुन्या भिंतीची  डागडुजी करायला गेलेल्या दुकादाराला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा  प्रकार राहुरीमध्ये घडलाय. याप्रकरणी दुकादार मिलिंद साखला यांनी फिर्याद दाखल केलीय.

७. श्री साई बाबांच्या शिर्डीत होळी विधिवत संपन्न
शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान विश्व्स्थांच्या वतीने  गुरूस्थान मंदिरासमोर आज होळी पेटविण्यात आलीय. या  होळीचे पूजन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हू्राज बगाटे आणि  त्यांची सुविद्य पत्नी सौ. संगिता बगाटे यांच्या शुभहस्ते करण्यात आलय. विधिवत हि पूजा करण्यात आलीय.

८. संगमनेरकर आजपासून आठच्या आत घरात!
राज्यात मोठ्या प्रमाणात कोविड बाधित समोर येवू लागल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्णय घेत आजपासून राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार रात्री आठनंतर संगमनेर शहर परिसरातील कोणतीही दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट अथवा सार्वजनिक ठिकाणे खुली राहणार नाहीत, यातून केवळ औषधांची दुकाने वगळण्यात आली आहे. 

९. होळी व रंगपंचमी सारखे सण एकत्रित साजरे करण्यास निर्बंध
कोरोनाच्या पार्शवभूमीवर होळी,रंगपंचमी हे सॅन एकत्र येऊन साजरे करण्यास मनाई करण्यात आलीय. असा देश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिलाय. अशी माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिलीय. 

१०. राहाता तालुक्यात ७ दिवस लॉकडाऊन
कोरोनामुळे राहता तालुक्यात सात दिवस लॉक डाऊन ठेवण्याचा निर्णय मुख्य अधिकाऱ्यांनी  घेतलाय. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राहाता शहरातील आस्थापना  30 मार्च ते  5 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अधिकारी अजित निकत यांनी दिली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *