शहराची खबरबात - घोडयांची शर्यत लावत मारले चाबकाचे फटके
News24सह्याद्री - घोडयांची शर्यत लावत मारले चाबकाचे फटके... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. गुलमोहार रोडवर वीज पडून नारळाचे झाड़ पेटले
सावेडीतील गुलमोहर रोड परिसरात शनिवारी रात्री वीज कोसळल्याने नारळाचे झाड पेटल आहे या वसाहतीतील नागरिकांच्या घरातील विद्युत साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
2. घोडयांची शर्यत लावत मारले चाबकाचे फटके
घोड्यास टांग्यांना जुपून शर्यत लावून ते शर्यतीत वेगाने पळावे, याकरीता त्यांना हातातील चाबुकाने क्रुरपणे मारहाण करुन निद्रयी वागणूक दिल्या प्रकरणी तसेच कोवीड 19 चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी रोग प्रतिबंधक कलमान्वये 13 ते 14 जणांविरूद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3. निर्मलनगरमधील घरांवरील विदयुत तारा हटविण्याची मागणी
निर्मलनगर परिसर हा गेल्या ३0 वर्षापासून वास्तव्यास असून आता हा भाग
झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या भागात मोठी लोकवस्ती निर्माण झाली आहे. पुर्वीच्या
काळामध्ये एमएसईबीने विद्युत तारा व पोल बसविण्यात आल्या आहेत.
४. नियम मोडत नगरकरांनी भरलाय 94 लाखांचा दंड
कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी मागील साडे चार महिन्यात पोलिसांनी 74 हजार 527 कारवाया करीत तब्बल 94 लाख 25 हजार 670 रुपयांचा दंड वसूल केला आहे या वर्षभरात सव्वीस हजार 856 जणांविरोधात गुन्हे दाखल केले गेलेत
5. राज्य सेवा परीक्षेला साडेनऊ हजार उमेदवार
शहरातील 51 केंद्रांवर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली सकाळच्या सत्रात 9505 तर दुपारच्या सत्रात 9883 उमेदवारांनी परीक्षा दिली या दरम्यान परीक्षार्थीच जर बाधित आढळला तर त्यासाठी प्रत्येक केंद्रावर पीपीई कीट आणि स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती मात्र तपासणीत कोणीही कोरणा बाधित आढळले नाही.
No comments
Post a Comment