अक्षयचा फर्स्ट लूक? अक्षय कुमारने चाहत्यांना विचारलं तुमचं मतं काय?
मुंबई -
खिलाडी अक्षय कुमारने नुकतच ‘अतरंगी रे’ या सिनेमाचं त्याचं शूटिंग पूर्ण केले आहे. सोशल मीडियावरून एक फोटो शेअर करत अक्षयने चाहत्यांना माहिती दिली होती. मात्र होळीची एका दिवसाची सुट्टी संपवत अक्षयने त्याच्या आगामी ‘राम सेतू’ सिनेमाच्या शूटिंगला लगेचच सुरुवात केली आहे. अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतून अक्षयने त्याचा ‘राम सेतू’ सिनेमातील लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अक्षयन फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हंटले आहे. माझ्यासाठी सर्वात खास असलेल्या एका सिनेमाचा प्रवास आज पासून सुरू. ‘राम सेतू’च्या चित्रीकरणाला सुरुवात. सिनेमात एका पुरातत्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारतोय. माझ्या लूकवर तुमची मत जाणून घ्यायला आवडेल. हे माझ्यासाठी नेहमीच महत्वाचं आहे. असे म्हणत त्याने चाहत्यांना त्याचा लूक कसा वाटला हे विचारंल आहे.
अक्षय कुमारचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. चष्मा, काहिसे पांढरे झालेले वाढलेले केस आणि गळ्यात स्कार्फ असा अक्षयचा लूक यात दिसून येतोय. अक्षयच्या या फोटोवर चाहत्यांनी हार्टचे इमोजी देत चाहत्यांनी पसंती दिली आहे. अभिषेक शर्मा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरुचा या दोघी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. परंतु, त्यांचे लूक्स अद्याप गुलदस्त्यात आहेत. मात्र अक्षयच्या लूकनंतर या सिनेमाबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता वाढली आहे. या सिनेमाबद्दल सांगताना अक्षय म्हणाला राम सेतूच्या कथेने मला नेहमीच अचंबित केलंय, प्रेरणा दिली आहे. राम सेतू हा भूतकाळातील, वर्तमानातील आणि भविष्यातील पिढ्यांमधील दुवा आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरा, भारताचं प्राचीन काळातलं महत्त्व, भारताचा समृद्ध वारसा यावर भाष्य करणारा हा सिनेमा असणार आहे.
No comments
Post a Comment