Breaking News

1/breakingnews/recent

हिना खानचा बिकिनी लूक मध्ये, मालदीवमधील फोटो व्हायरल

No comments



मुंबई -

'ये रिश्ता क्या कहलाता हैं' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हिना खान.हिने आपल्या इंस्टाग्राम वर मालदीव मधील बिकनी फोटो शेयर केले आहे. बिग बॉस, खतरों के खिलाडी या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून हिनाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. हिना सध्याच्या घडीला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर हिनाचे आज असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. कमी कलावधीत हिना तुफान लोकप्रिय झाली. 

अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सध्या हिना मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. मालदीव हे स्वच्छ, निर्मळ आणि मन मोहून टाकणाऱ्या सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. हिनाने मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर काढलेले ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हिना प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. हिनाने शेअर केलेला बिकीनी लूक सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. कधी बीचवर तर कधी समुद्रात जाऊन हिनाने खास फोटो शूट केलं आहे. या सुंदर फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी या फोटोंवर कौतुकाचा वर्षावर केला आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *