Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - अवघ्या चोवीस तासात तब्बल ६११ कोरोना बाधित रुग्ण

No comments

     News24सह्याद्री अवघ्या चोवीस तासात तब्बल ६११ कोरोना बाधित रुग्ण..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. शहरात आणखी पाच कंटेनमेंट झोन
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने बुधवारी आणखी पाच ठिकाणी मायक्रो कंटेनमेंट झोन करण्यात आले आहेत. त्यामुळे कंटेनमेंट झोनची संख्या १५ झाली असून, हा भाग पत्रे लावून बंद करण्यात आला आहे.
शहर व परिसरातील कोरोनाचा आकडा १९६ झाला आहे. 

2. अवघ्या चोवीस तासात तब्बल ६११ कोरोना बाधित रुग्ण  
कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यायची, हे नियम आणि प्रतिबंधात्मक उपाय आता लहान मुलांना देखील तोंडपाठ झाले आहेत. पण जाणते आणि मोठे लोकं या नियमांचे पालन करत नसल्याचा विरोधाभास असल्याने कोरोनाने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले आहे. 

3. रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत पाठपुरावा करणार : आ. जगताप
शहरच्या विकासात प्रत्येकांचे योगदान राहिले पाहिजे. शहरातील भैतिक सुविधांबरोबरच तेथील बाजारपेठ आणि इतर सेवांवर शहराची ओळख होत असते. त्यामुळे प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करुन नागरिकांबरोबरच शहरात येणार्‍यांना चांगली सेवा दिली पाहिजे. 

4. पाणीपातळी बाबत पालिका निरुत्तर
शहर व उपनगरातील पाणीपुरवठा करणाऱ्या वसंत टेकडी येथील पाणी पातळीत घट  का झाली या  घुले यांच्या या प्रश्नावर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी निरुत्तर झाले काहींनी कर्मचारी अपुरे असल्याचे कारण देत खासगीकरण करण्याची सूचना मांडल्याने पाणीपुरवठा विभागाचे चांगलेच हसे  झाले.

5. फ्लॅटचे आमिष दाखवून  नऊ लाखांना गंडा
शहरातील सारसनगर मधील प्रकल्पात फ्लॅट देण्याच्या आमिषाने बांधकाम पर्यवेक्षकास  चार वर्षे विना मोबदला राबवून घेतले त्यानंतर घरातील सजावटीसाठी त्याच्याकडून नऊ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *